अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी एकत्र काम करून अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘धोबी घाट’, ‘पीपली लाइव्ह’ आणि यावर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवलेला ‘लापता लेडीज’ असे समीक्षकांनी कौतुक केलेले चित्रपट तयार केले आहेत. १६ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, मात्र ते आजही एकत्र सिनेमे करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटस्फोटानंतरही एकत्र काम करताना आलेले अनुभव आणि व्यावसायिक व कलात्मक क्रिएटिव्हिटीच्या (सृजनात्मक) पातळीवर यशस्वी सहकार्याचे गुपित सांगताना ‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत किरण राव म्हणाली, “यासाठी खूप संयमाची गरज असते.” आमिर खाननेही याला सहमती दर्शवली आणि सांगितले, “घटस्फोट हा वेगळा विषय आहे, पण सृजनात्मक पातळीवर आमचे विचार एकमेकांशी खूप जुळतात. आमचा एकमेकांच्या विचारांवर विश्वास आहे, म्हणूनच आमचे काम उत्तम चालते; आमची संवेदनशीलताही जवळपास सारखीच आहे.”

हेही वाचा…२३ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची भेट, पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले…

किरण पुढे (Kiran Rao) म्हणाली, “जेव्हा आमच्यात मतभेद होतात, तेव्हा एकमेकांना एखादी गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतो. मी त्याच्याकडे जाऊन माझ्या भावना मांडते आणि माझ्या बाजूची कारणे देते. आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो. कदाचित यामुळेच आमचे सहकार्य टिकून आहे.”

आमिरने हे देखील सांगितले की, त्यांच्या घटस्फोटाने त्यांच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक नात्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नाही. “घटस्फोटामुळे आम्ही फक्त पती-पत्नी म्हणून विभक्त झालो आहोत, व्यक्ती म्हणून आम्ही एकत्रच आहोत.”

हेही वाचा…अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

या मुलाखतीत एका हलक्याफुलक्या क्षणी आमिरने सांगितले की, विभक्त झाल्यानंतर त्याने किरणला विचारले, “मी चांगला पती कसा बनू शकतो?” किरणने यावर त्याला ११ मुद्द्यांची यादी दिली, ज्यातल्या एका मुद्द्यात तिने सांगितले की, “तू खूप बोलतोस.” आमिर हसत म्हणाला, “ती म्हणाली, ‘तू प्रत्येक कार्यक्रमात स्वतः खूप बोलतोस आणि इतरांना बोलायला संधी देत नाहीस.’”

यावर किरण म्हणाली, “आता सार्वजनिकपणे सगळे सांगणार आहेस का?” आमिरने उत्तर दिले, “तू शांत बस…” आणि सांगितले, “मी तिच्या टिप्स माझ्या फोनवर लिहून ठेवल्या आहेत.”

हेही वाचा…दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

किरण म्हणाली, आता मला त्या सल्ल्याची…

किरणने उर्वरित टिप्सबद्दल विचारल्यावर आमिर म्हणाला, “मी रोज त्यावर काम करत आहे.” आमिर पुढे म्हणाला, “तिने मला कधीच विचारले नाही की, ‘मी चांगली पत्नी कशी होऊ शकते?’ कधी विचार, मी सांगेन.” यावर किरणने हसत उत्तर दिले, “मी आता तुझी पत्नी नसल्याने मला त्याची गरज नाही.”

हेही वाचा…खुशी कपूरने स्वत: दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेला ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आमिर आणि किरण यांचे नाते २००१ मध्ये सुरू झाले आणि चार वर्षांच्या डेटिंगनंतर, २८ डिसेंबर २००५ रोजी त्यांनी लग्न केले. हे आमिरचे दुसरे लग्न होते; यापूर्वी त्याने रीना दत्ताशी १९८६ मध्ये विवाह केला होता, रीना आणि आमिर यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. जुलै २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी आपल्या १६ वर्षांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला, मात्र त्यांचे सृजनात्मक सहकार्य आजही सुरूच आहे.