बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान मोठ्या पडद्यावर हिट होऊ शकला नाही. पण त्याने चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान मात्र निर्माण केलं आहे. त्याचा साधेपणा आणि खऱ्या आयुष्यात लोकांशी असलेलं वागणं, विचार याचे असंख्य चाहते आहे. सध्या फैजल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो अत्यंत साधेपणाने दिवाळीची खरेदी करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये फैजल खान फुल विक्रेत्यांकडून वेगवेगळी फुलं विकत घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये फैजल खान फुल विक्रेत्यांकडू फुलं विकत घेताना आणि त्यांना, “मी रात्री उशीरा येऊन फुलांचे १५ हार घेऊन जाणार आहे. जेव्हा हार तयार होतील तेव्हा मला कॉल करा मी स्वतः ते न्यायला येईन.” असं सांगताना दिसत आहे.

आणखी वाचा- Photos : ‘दिवाळीत फटाके फोडू नका’ असे आवाहन करायला गेले आणि ‘हे’ सेलिब्रिटी झाले ट्रोल

फैजलचा हा व्हिडिओ पाहून तो या फुल विक्रेत्यांशी नियमित संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. चित्रपट कलाकार दिवाळी उत्साहात साजरी करतात, पण अशा प्रकारे प्रत्येकजण स्वत: रस्त्यावर खरेदी करू शकत नाही. फैजलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. सेलिब्रेटी असूनही त्याचा साधेपणा पाहता त्यांला लोकांचं खूप प्रेम मिळत आहे. त्याच्या साधेपणाचं सर्वांना कौतुक वाटत आहे.

फैजल खानचा ‘फॅक्टरी’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रोली रायन, राज कुमार कनोजिया आणि रिब्बू मेहरा यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. फैजल याआधी ‘मदहोश’, ‘मेला’, ‘प्यार का मौसम’, ‘कयामत से कयामत तक’, ‘बॉर्डर हिंदुस्तान का’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.

आणखी वाचा- Ind vs Pak: अनुष्का शर्माच्या ‘त्या’ पोस्टला ४७ लाखांहून अधिक Likes; विराट कोहली ही कमेंट करत म्हणाला, “प्रत्येक क्षणी माझ्या…”

काही वर्षांपूर्वी फैजल खानने त्याचा भाऊ आमिर खानवर अनेक गंभीर आरोप केले होते, त्यामुळे तो खूप चर्चेत आला होता. फैजलने केलेले खुलासे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. २००७-२००८ मध्ये फैजलने स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध कायदेशीर लढाई लढली होती. आमिर खानने मानसिक आजार असल्याचे सांगून त्याला खोलीत डांबले, असा आरोप त्याने केला. तसेच त्याला चुकीची औषधेही देण्यात आल्याचा आरोपही त्याने केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan bother faisal khan diwali celebration video 2022 viral mrj