बॉलीवूड अभिनेता आमिर खानने मुंबईत मालमत्ता खरेदी केली आहे. सध्या अभिनयातून ब्रेकवर असलेल्या आमिर खान रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. आमिरने मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पाली हिल भागात अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

आमिरने पाली हिलमध्ये खरेदी केलेली नवीन मालमत्ता ‘रेडी-टू-मूव्ह-इन’ आहे. हे अपार्टमेंट अंदाजे १,०२७ चौरस फुटाचे आहे. २५ जून रोजी झालेल्या अंतिम डीलनुसार यासाठी त्याने ३० हजार रुपये नोंदणी शुल्क व ५८.५ लाख स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरले आहे. त्याच्या या अपार्टमेंटची किंमत ९.७५ कोटी रुपये आहे. आमिर खानची नवीन मालमत्ता पाली हिल परिसरातील बेला विस्टामध्ये आहे. याशिवाय आमिर खानचा मरीना अपार्टमेंटमध्ये एक आलिशान फ्लॅट आहे जो पाली हिलमध्येच आहे.

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

वांद्रेमध्ये आहे आमिरचा आलिशान बंगला

आमिर खानचा मुंबईतील वांद्रे येथे पाच हजार चौरस फूट जागेत सी-फेसिंग बंगला आहे. हा दोनमजली आहे. २०१३ मध्ये आमिरने पानघानी इथं सात कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. आमिरने कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये खूप पैसा गुंतवला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, आमिर खानकडे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहबादमध्ये २२ घरं आहेत.

Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा

आमिर खानची एकूण संपत्ती

अभिनेता आमिर खानचे वडील ताहिर हुसैन खान चित्रपट निर्माते होते. आमिरने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ मधून बॉलीवूड पदार्पण करणाऱ्या आमिर खानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे बहुतांशी चित्रपट हिट राहिले. आमिरने २००१ मध्ये त्याचे प्रॉडक्शन हाउस सुरू केले होते. सध्या आमिर खान फक्त अभिनेताच नाही तर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता देखील आहे. ‘द फायनान्शियल एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, आमिर खानकडे मार्च २०२४ पर्यंत १८६२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो अखेरचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसला होता. यानंतर त्याने काही काळ कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता. आता तो लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात झळकणार आहे. दुसरीकडे, आता आमिरच्या मुलानेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जुनैद खानचा ‘महाराज’ चित्रपट २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.