Why Mansoor Khan quit Bollywood : चित्रपट निर्माता मन्सूर खानचा एका यशस्वी चित्रपट कुटुंबातील आहे. त्याने स्वत: दिग्दर्शक म्हणून उत्तम काम केलं. त्याने अनेक मोठ्या स्टार्सबरोबर चित्रपट केले. मात्र, मुंबईत राहायचं नाही; या गोष्टीवर तो ठाम होता. ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ यांसारख्या उत्तम चित्रपटांचा दिग्दर्शक व आमिर खानचा चुलत भाऊ मन्सूर खान आता मुंबई सोडून खूप दूर राहतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मन्सूर खान आता तमिळनाडूमधील कुन्नूर येथे राहतो. याठिकाणी त्याचे चीज फार्म आहे. ‘इंडिया नाऊ अँड हाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की त्याने स्वतःला चित्रपटाचा चाहता किंवा चित्रपट निर्माता समजलं नाही. “ते मला एक यशस्वी चित्रपट निर्माता म्हणून ओळखतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना एक गोष्ट समजत नाही, ती म्हणजे मी प्रसिद्धी आणि पैसा सोडू कसा शकते. पण खरं तर, त्याआधी १९७८ मध्ये जेव्हा मी अमेरिकेत होते, तेव्हाच मी ठरवलं होतं की मला मुंबईत राहायचं नाही,” असं मन्सूर म्हणाला.
मुंबई सोडायचं आधीच ठरवलं होतं – मन्सूर खान
आ
“ही गोष्ट काही अचानक घडली नव्हती, मी आधीच ठरवलं होतं. मी इथून सगळं केव्हा सोडू शकेन, फक्त हा एकच प्रश्न होता. आता मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण बरेच तरुण माझ्या शेतात येतात आणि विचारतात की मी वैद्यकीय सुविधा नसलेल्या ठिकाणी हे कसं करू शकलो. मी त्यांना सांगतो की त्यांना कुन्नूरला जाण्याची गरज नाही; मला फक्त शहरात राहायचे नव्हतं. कुन्नूर स्वर्ग आहे, पण माझ्यासाठी मोकळी जागाही राहायला पुरेशी आहे,” असं मन्सूर खान म्हणाला.
पत्नीची समजूत कशी काढली?
इंडस्ट्री सोडणे हा त्याच्यासाठी मोठा निर्णय नव्हता, कारण त्याला चित्रपट बनवायचे नव्हते, असं मन्सूर म्हणाला. पण त्याची पत्नी टीना जिने मुंबईत ‘बेकर’ म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं होतं तिच्यासाठी मुंबई सोडणं थोडं आव्हानात्मक होतं. मन्सूर म्हणाला, “मी खूप चांगली समजूत काढतो. ती (टीना) तिथे केक बनवायची आणि आमिरची पहिली पत्नी रीनाबरोबर तिचा व्यवसाय करत होती. ती म्हणाली, ‘जेव्हा मला आयुष्यात दिशा सापडली तेव्हाच तू मला इथून दूर नेतोय’ आणि तिने मला विचारलं की ती इथे काय करणार आहे. मी तिला म्हटलं, ‘हे बघ, तू खूप छान केक बनवतेस, पण इथे सगळेच केक बनवतात, त्यामुळे तुला काहीतरी वेगळं करावं लागेल’. यानंतर मन्सूर व टीना यांनी चीज बनवण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटांबद्दल बोलण्यात रस नाही – मन्सूर खान
मन्सूर म्हणाला की जर त्याची पत्नी कुन्नूरमध्ये आनंदी नसेल तर तो आनंदी राहू शकत नाही. कारण तिला हे करायला भाग पाडायची इच्छा नाही. तसेच मला चित्रपटांबद्दल बोलण्यात रस नाही, त्याऐवजी नॉन-फिक्शन लेखक म्हणून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेल, असंही त्याने नमूद केलं.
मन्सूर इम्रान खानच्या ‘जाने तू या जाने ना’ या पदार्पणाच्या चित्रपटावर काम करण्यासाठी परत आला होता. त्यानंतर आता तो आमिरचा मुलगा जुनैद खानचा दुसरा चित्रपट ‘एक दिन’वर काम करण्यासाठी मुंबईला परतला. मन्सूरला दोन अपत्ये आहेत. त्याची मुलगी झेन मेरी देखील एक अभिनेत्री आहे.