बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान आता नुपूर शिखरेचा सासर झाला आहे. आमिरची लाडकी लेक आयरा खान नुकतीच नुपूरबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. आयरा-नुपूरच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. यामधील आमिरच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे; ज्यामध्ये अभिनेता त्याच्याच चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. तिने लोकप्रिय फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर दोन पद्धतीने लग्न केलं. ३ जानेवारीला आयरा-नुपूर नोंदणी पद्धतीने लग्नबंधनात अडकले. त्यानंतर ११ जानेवारीला दोघांचा उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीत लग्नसोहळा पार पडला. हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात झाला. अनेक पार्टी आणि सोहळे पाहायला मिळाले.

हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यात ‘या’ लोकप्रिय मालिकेने गाशा गुंडाळला, काल प्रसारित झाला शेवटचा भाग

सध्या आमिर खानचा आयरा-नुपूरच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमिर त्याच्याच ‘गुलाम’ चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्याबरोबर इतर मंडळी देखील त्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. आमिरचा हा व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘रेड २’ चित्रपटाचा खलनायक ठरला, अजय देवगणला टक्कर देणार ‘हा’ मराठी सुपरस्टार

आमिर खानचा जावई नुपूर शिखरे पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे. Fitnessismची सुरुवात त्याने केली आहे. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय त्याने दशकभर तो सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.

Story img Loader