अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही सध्या चर्चेत आली आहे. नुकताच आयरा आणि तिचा बॉयफ्रेंड फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा साखरपुडा पार पडला आहे. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोशल मीडियावर त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. पण यादरम्यानचा आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
आपल्या लेकीच्या साखरपुड्याचा आनंद आमिरच्या चेहऱ्यावर संपूर्ण दिवस दिसत होता. हा साखरपुड्याचा सोहळा त्याने खूप एन्जॉय केला. या आनंदात त्याने स्वतःच्याच गाण्यावर डान्सही केला. आमिरच्या या डान्सने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा : “फक्त ३५ सेकंदांचा टीझर पाहून…”; क्रिती सेनॉनचं ‘आदिपुरुष’ला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
आयराच्या साखरपुड्यातला आमिर खानचा हा व्हिडिओ सध्या खूप वायरल होत आहे. या व्हिडिओत आमिर खान पठाणी सूट घालून ‘पापा कहते हैं’ या गाण्यावर थिरताना दिसत आहे. आमिर खान बाल्कनीत उभा असताना मंसूर खान तिथे येतात आणि आमिर खान त्यांच्याही हाताला धरून त्यांना नाचण्याची विनंती करतो. मग दोघेजण ‘पापा कहते हैं’ या गाण्यावर ताल धरताना या व्हिडिओत दिसत आहेत.
हेही वाचा : “तुमच्या मूर्खपणामुळे निर्मात्यांना…”; ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट करणाऱ्यांवर संतापला अभिनेता मानव विज
आमिर खान डान्स करत असताना त्याची मुलगी आयरा ही खाली इतर नातेवाईकांमध्ये उभी राहून आमिर खानला प्रोत्साहन देताना या व्हिडिओत दिसत आहे. आपल्या वडिलांना नाचताना पाहून तीही फार खुश आहे. आयराबरोबर तिचा होणारा नवरा नुपूर शिखरेही आमिर खानला चिअर करताना दिसत आहे. एकंदरीतच हा साखरपुडा अत्यंत उत्साहात पार पडल्याचे या व्हिडिओतून समोर येत आहे.