Aamir Khan Ira Khan Video: मागील काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता आमिर खान सातत्याने चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने ६० व्या वर्षी पुन्हा प्रेमात पडल्याची बातमी सर्वांशी शेअर केली. आमिरने १३ मार्चला माध्यमांबरोबर त्याचा वाढदिवस साजरा केला तेव्हा त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांशी ओळख करून दिली. आमिर व त्याच्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्याची लेक आयरा खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आयरा रडवेली दिसत आहे.

आयरा खान ही रीना दत्ता आमिर खान यांची लेक आहे. मागील वर्षी तिचं जिम ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्न झालं. आयराचे आई-वडील एकाच इमारतीत राहत असल्याने ती बरेचदा त्यांना भेटायला येत असते. आता या व्हिडीओत फक्त आमिर व आयराच दिसत आहेत.

आमिर व आयराचा एक व्हिडीओ विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत आयरा आमिरशी बोलताना दिसतेय, नंतर ती त्याला भेटून गाडीत बसते. तर आमिरही त्याच्या गाडीने तिथून निघून जातो.

पाहा व्हिडीओ-

गाडीत बसलेल्या आयराचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केला आहे. या व्हिडीओत आयराचा रडवेला चेहरा पाहून तिला नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करून आयराला काय झालं, त्यांच्या घरात सगळं ठिक आहे ना? आमिर खान तिसरं लग्न करतोय, आमिर खान गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करायला तयार झाला नसेल, तिने खुशी कपूर व इब्राहिम अली खानचा नादानियां चित्रपट पाहिला असेल अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

Ira khna crying
व्हिडीओवरील कमेंट्स
Ira khna crying
व्हिडीओवरील कमेंट्स
Ira khna crying
व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, आमिर खानने नुकतीच त्याच्या नव्या गर्लफ्रेंडशी ओळख करून दिली आहे. गौरी ही सहा वर्षांच्या मुलाची आई आहे. ती मुळची बंगळुरूची असून आमिर खान प्रॉडक्शनमध्ये काम करते. तिचे वडील आयरीश व आई तमिळ आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.

आमिर व गौरी दीड वर्षापासून डेट करत आहेत. आमिरने गौरीची कुटुंबियांशी ओळख करून दिली आहे. इतकंच नाही तर त्याने सलमान खान शाहरुख खान यांना देखील गौरीची गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली आहे. आमिरने गर्लफ्रेंडबरोबर इरफान पठानच्या बायकोच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती.

Story img Loader