अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही पुन्हा चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला होता. तिने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या आयरा आणि नूपुर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्री-व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत आहेत.
हॉटेलमध्ये सकाळी ब्रेकफास्ट टेबलवरचा आयराने नो मेकअप लूक शेअर केला आहे. याबरोबरच तिने नूपुरला टॅग करत त्यांच्याबरोबर यंदाचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करत असतानाचा एकक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि या फोटोमध्ये तिने तिच्या होणाऱ्या सासूबाईंनाही एक खास मेसेज दिला आहे.
आणखी वाचा : नव्या गाण्यामुळे सलमान खान होतोय ट्रोल; भाईजानची ‘हुक स्टेप’पाहून चाहते म्हणाले, “हा डान्स आहे की…”
या हॉटेलमध्ये ते दोघे ब्रेकफास्टमध्ये खांडवीचा आस्वाद घेताना दिसत आहे. यावेळी आयराला आपल्या सासूची आठवण झाल्याने तिने त्यांना या फोटोमध्ये टॅग केलं आहे. नूपुरची आई प्रीतम शिखरे यांना टॅग करत आयराने लिहिलं आहे की, “तुमच्या हातची खांडवी ही अप्रतिम आहे. ही ब्रेकफास्टवर दिलेली टिप्पणी नाही, पण मी दिलेली ही कॉमेंट वाचताना माझ्या होणाऱ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर हसू येऊन त्या लाजल्या पाहिजेत.”

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. तिने कायमच नुपूरबरोबर असलेल्या नात्याचा स्वीकार केला. विशेष म्हणजे तिने आपला मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींचा तो फिटनेस ट्रेनिंग देतो. काही दिवसांपूर्वी इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने आयरासमोर गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं. यावेळी आयराने अगदी हसत त्याला होकार दिला.