बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. आमिरच्या घरी सध्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आमिरने आयरा व नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली होती. ३ जानेवारी २०२३ रोजी दोघांचं लग्न होणार आहे. त्यापूर्वी आयरा व नुपूरचा केळवणाचा कार्यक्रम पार पडला. या केळवणाचे फोटो आयराने शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Photos: आमिर खानच्या लेकीचं पहिलं केळवण! आयरा खान-नुपूर शिखरेचा अस्सल मराठमोळा अंदाज, विहीणबाईंचा वेगळाच थाट

केळवणासाठी दोघेही खूप छान तयार झाले होते. नुपूरने कुर्ता घातला होता. तर आयराने साडी नेसली व नाकात नथ घातली होती. तसेच तिने कपाळावर चंद्रकोर लावली होती. नुपूर व आयराच्या पहिल्या केळवणाचे सुंदर फोटो समोर आले आहेत. तिच्या केळवणाला अभिनेत्री मिथिला पालकरदेखील उपस्थित होती. तसेच नुपूरची आई प्रीतम शिखरे व आयराची आई रीना दत्ता या दोघीही हजर होत्या. आयराने या दोघींचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने इतर पाहुण्यांबरोबरचे फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. त्यात एक व्हिडीओदेखील आहे, ज्यामध्ये आयरा नुपूरसाठी उखाणा घेताना दिसते.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

आयराने नुपूरसाठी खास मराठीत उखाणा घेतला आणि त्याला घास भरवला. “मला मराठी येत नाही, पण पोपयसाठी मी कधी नाही म्हणत नाही,” असा उखाणा तिने होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला. नुपूरला सगळे ‘पोपय’ या नावाने हाक मारतात. त्यामुळे तिने उखाण्यातही त्याचं हेच नाव घेतलं.

दरम्यान, आयराच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांनी आयराच्या मराठीचं कौतुकही केलं आहे. आयरा व नुपूर मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ते जानेवारी महिन्यात लग्न करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan daughter ira khan marathi ukhana for nupur shikhare see video hrc