आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व नुपूर शिखरे विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर आज (१० जानेवारी रोजी) उदयपूरमध्ये मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नात आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर, नुपूरने ग्रे कलरचा सूट आजच्या खास दिवसासाठी निवडला होता. पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांनी हातात हात घालून एंट्री घेतली. त्यांनी एंट्री घेतल्यावर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी दोघांवर फुलांचा वर्षाव केला. दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते.

Videos: आयरा खान व नुपूर शिखरे यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न, मुकेश अंबानींनी पत्नीसह लावली हजेरी, व्हिडीओ आले समोर

आयरा खान व नुपूरच्या लग्नाचा व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून नुपूर व आयराला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. आयरा व नुपूरचा आंतरधर्मीय विवाह आहे. दोघांचं लग्न आधी नोंदणी पद्धतीने पार पडलं होतं, त्यानंतर आज त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.

Video: नुपूर शिखरे धावत पोहोचला लग्नस्थळी, ढोल वाजवत केला जोरदार डान्स, वरातीचे व्हिडीओ व्हायरल

मुंबईत ३ जानेवारी झालेल्या सोहळ्यात नुपूर शिखरे घरातून कार्यक्रमस्थळी धावत पोहोचला होता. तो शॉर्ट्स व बनियनमध्ये पोहोचला आणि त्यांनी लग्न केलं. नंतर त्याने सुंदर शेरवानी घातली होती. त्यांच्या लग्नाच्या व्हिडीओची खूप चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan daughter ira khan nupur shikhare udaipur wedding videos out hrc