बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान मनोरंजसृष्टी नसली तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी उघडपणे तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. मध्यंतरी एका पोस्टमधून तिने गेल्या काही वर्षांपूर्वी डिप्रेशनचा सामना केला असल्याचं सांगितलं. तर नुकतंच आत्महत्या या विषयावर भाष्य केलं.
काल जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन होता. यानिमित्त तिने आत्महत्या न करण्याबाबत जनजागृती केली. काल मुंबईतील एका कॅफे समोर ती पापाराझींना दिसली. यावेळी तिने आत्महत्या या विषयावर बोलत सर्वांना सावध केलं.
ती म्हणाली, “आज सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. म्हणजेच आत्महत्या करण्यापासून एखाद्याला रोखण्याचा दिवस. आत्महत्या हा विचार खूप भयानक आहे आणि याबद्दल लोक कोणाला सांगू शकत नाहीत. पण जर तुम्ही त्यांना याबद्दल विचारलं तर एक विश्वास वाटेल की कोणीतरी आहे ज्याच्याशी मी याबद्दल बोलू शकतो. अनेकांना वाटतं की जर आपण त्यांच्याशी या विषयावर बोललो तर त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतील पण तसं होत नाही.”
तर तिचा हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला असून त्यावर कमेंट करत नेटकरी सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. तर ती करत असलेल्या जनजागृतीबद्दल अनेक जण तिचं कौतुकही करत आहेत.