बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीत लग्न केलं. त्यानंतर उदयपूरमध्ये १० जानेवारीला मोठ्या थाटामाटात ख्रिश्चन पद्धतीत दोघांचं लग्न झालं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अशातच नुकतेच आयराने इंडोनेशियातील हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत; जे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयरा खानने हनिमूनचे फोटो शेअर करत लिहिल आहे, “तुमचा हनीमून कसा होता?….आय लव्ह यू नुपूर शिखरे. एक महिना, ४ वर्ष, अंडरवॉटर, सकाळी ३ वाजता, अपसाइड डाउन, अँटी क्लाइमॅटिक, हायली क्लाइमॅटिक…जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत काही वाटत नाही.”

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील ‘या’ अभिनेत्रीची ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत धमाकेदार एन्ट्री, पाहा प्रोमो

आयराने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती नवरा नुपूरबरोबर पाहायला मिळत आहे. यावेळी आयराने आकाशी रंगाची बिकिनी घातली आहे. दुसऱ्या फोटोमध्ये नुपूर समुद्र किनारी हँडस्टँड करताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये आयरा-नुपूर सुमद्र किनारी बसलेले पाहायला मिळत आहेत. असे १० फोटो आयराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टवर नुपूरने “आय लव्ह यू आयरा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा येणार दुसरा भाग, ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याने केला खुलासा

दरम्यान, आमिर खानचा जावई हा पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे. Fitnessismची सुरुवात त्याने केली होती. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. तसेच त्याने दशकभर सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. याशिवाय नुपूर पुलकित सम्राट, राणा डग्गुबती आणि अनेक सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan daughter ira khan share honeymoon moments with husband nupur shikhare pps