अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला. तिने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आयरा खानने स्वत: तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आयरा खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच आयराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर तिचा होणारा नवरा सूट-बुट घालून पाहायला मिळत आहे. अगदी साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा पार पडला. आयरा आणि नुपूरच्या या साखरपुड्याला कुटुंबातील तसच इतर काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. आयरा व नुपूरच्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा : लॉकडाऊनमधील प्रेम ते लिव्ह-इन रिलेशन, आमिर खानच्या लेकीची हटके लव्हस्टोरी, जाणून घ्या त्याच्या मराठमोळ्या जावयाबद्दल….
या व्हिडीओत ते दोघेही अगदी फिल्मी स्टाईलने एकमेकांच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहेत. त्यावेळी त्या दोघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने याची वाट बघत होते. अंगठी घातल्यानंतर ते दोघेही नाचतानाही दिसत आहे. या कार्यक्रमावेळी आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, आझाद राव खान, इमरान खान, मन्सूर खान आणि आयराची आजी झीनत हुसैन सहभागी झाले होते.
आणखी वाचा : “पण माझ्या डोक्यात हवा…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत स्पष्टच बोलला
दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. तिने कायमच नुपूरबरोबर असलेल्या नात्याचा स्वीकार केला. विशेष म्हणजे तिने आपला मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींचा तो फिटनेस ट्रेनिंग देतो. काही दिवसांपूर्वी इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने आयरासमोर गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं. यावेळी आयराने अगदी हसत त्याला होकार दिला. या दोघांचा एकमेकांना प्रपोझ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता.