चित्रपट अभिनेते, त्यांचे कुटुंब व त्यांची मुलं कायम चर्चेचा विषय असतात. पण, अनेक सुपरस्टार अभिनेत्यांची मुलं अभिनयापासून दूर आहेत. स्वतः बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर असले तरी पालकांमुळे हे सेलिब्रिटी किड्स पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात. आता अशाच एका सेलिब्रिटीच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Video: डोळ्यांवर गॉगल, वाढलेले केस अन् दाढी; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का?
तिने आलिशान कार सोडून चक्क रिक्षाने प्रवास केला आहे. तिचा रिक्षाने प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी तिचं खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ ‘विरल भयानी’ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी तिने गॉगलही लावला आहे. आता या व्हायरल व्हिडीओत नक्की कोण आहे ते तुम्हीच पाहा.
या व्हिडीओत असलेली मुलगी आहे अभिनेता आमिर खानची लेक इरा खान. इराने कार सोडून रिक्षाने प्रवास केला आणि तिचा प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये इरा तिच्या एका मैत्रिणीबरोबर रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. चाहतेही या व्हिडीओवर कमेंट करत इराच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.