अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. सध्या ती व नुपूर पारंपारिक मराठी केळवणाचा आनंद घेत आहेत. आयराने काही दिवसांपूर्वी तिच्या पहिल्या केळवणाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिच्या दुसऱ्या केळवणाचे फोटो चर्चेत आहेत.

Video: “मला मराठी येत नाही, पण…”, आमिर खानच्या लेकीचा होणाऱ्या पतीसाठी अस्सल मराठीत उखाणा

आयरा खानने दुसऱ्या केळवणासाठी खास नऊवारी नेसली होती. तिने फ्लॉवर ज्वेलरीने तिचा लूक पूर्ण केला. तसेच नाकात तिने नथ घातली होती. या फोटोंमध्ये आयरा खूपच सुंदर दिसत आहे. केळवणासाठी नुपूरने पिवळा कुर्ता घातला होता. फोटोंमध्ये आयरा व नुपूरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळी तिने नुपूरसाठी खास उखाणा घेतला.

केळवणासाठी आमिर खानच्या लेकीने नेसली नऊवारी, आयरा-नुपूर शिखरेचा मराठी थाट चर्चेत, पाहा Photos

“दुसरं केळवण, दुसरा उखाणा. मी त्याच्यावर खूप प्रेम करते,” असं कॅप्शन तिने केळवणाच्या फोटोंना दिलं आहे. दरम्यान तिने “आता मला मराठी येते आणि मी पपोयला घेऊन जाते”, असा उखाणा तिने घेतला. नुपूरला प्रेमाने सगळे पपोय अशी हाक मारतात.

दरम्यान, आयरा खान व नुपूर शिखरे मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिरने आयरा व नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली होती. ३ जानेवारी २०२३ रोजी दोघांचं लग्न होणार आहे.

Story img Loader