बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान याची लेक इरा खान नेहमी चर्चेत असते. बॉलीवूडपासून दूर असली तरी इरा कधी सोशल मीडियावरील फोटो किंवा व्हिडीओमुळे, तर कधी आजारपणामुळे चर्चेत असते. बऱ्याच काळापासून तिची क्लिनिकल डिप्रेशनशी झुंज सुरू आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये तिनं मानसिक आजारपणात कुटुंबाकडून मिळत असलेल्या पाठिंब्याचा अनुभव सांगितला.
इरा खान तिच्या आजारापणाबद्दल नेहमी खुलेपणाने बोलत असते. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं, “जेव्हा मी सलग चार दिवस जेवत नव्हते, तेव्हा मी माझ्या आई-बाबांना मला ठीक वाटत नसल्याचं सांगितलं. माझ्या मानसिक आजाराचा माझ्या कुटुंबीयांनी कधीच जास्त बाऊ केला नाही. या आजारपणात ज्या गोष्टींची मला गरज भासत होती, त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. या संकटात माझ्या कुटुंबीयांची साथ भक्कम होती.”
हेही वाचा – जयंत सावरकरांच्या निधनावर अभिनेत्री रुपाली भोसलेची भावुक पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “अण्णा तुम्ही…”
“पण तरीसुद्धा मला खूप त्रास होत होता. माझ्या घरच्यांसाठी थेरपीला जाणं हे काही नवल नव्हतं. त्यांनी या गोष्टीचा कधीच बाऊ केला नाही. मी १२ वर्षांची असताना माझ्या आईनं मला थेरपीला पाठवलं. त्या वेळेला मला अजिबात थेरपीला जावंसं वाटत नव्हतं. परंतु, तिचं म्हणणं असायचं की, मी थेरपीला जायलाच हवं. या काळात आई-बाबांनी दिलेली साथ खूप बळ देणारी होती.”
हेही वाचा – “दिग्दर्शक ब्रेस्ट साइज विचारायचे अन्….” शर्लिन चोप्रानं सांगितला धक्कादायक अनुभव
पुढे इरानं सांगितलं की, “२०१९ साली मी एक नाटक करीत होते. त्या वेळेस मला क्लिनिकल डिप्रेशन असल्याचं माहीत होतं. तेव्हा मी एका व्यक्तीशी बोलत होते. त्यानं मला सांगितलं की, ए. आर. रेहमान हेसुद्धा त्यांच्या एंजायटीविषयी खुलेपणानं बोलायचे. आपण आपल्या या आजाराबद्दल एखाद्याला सांगू शकतो, हेच किती चांगलं आहे ना.”