बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अन् आमिर खान यांच्यात अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आज दोघांनी आपआपल्या आयुष्यात बरंच काही कामावलं असलं तरी मध्यंतरी असा एक काळ होता जेव्हा या दोघांनी एकमेकांवर भरपूर टीका केली होती. त्याआधीदेखील हे दोघे चांगलेच मित्र होते. शाहरुख हा टेक्नॉलॉजीच्या अत्यंत प्रेमात आहे. एखादं नवीन तंत्रज्ञान आलं असल्यास ते जाणून घेण्यात तो कायम पुढे असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९६ दरम्यान एक नवा लॅपटॉप नव्या तंत्रज्ञानासह बाजारात आला होता. त्यावेळी तो लॅपटॉप आमिर खानने घ्यावा असं शाहरुखने त्याला सुचवलं होतं. अखेर शाहरुखने स्वतः तो लॅपटॉप आमिरसाठी विकत घेतला अन् त्याला भेट म्हणून दिला. आमिर खानने मात्र तब्बल ५ वर्षं त्या लॅपटॉपला हातही लावला नाही. याविषयीचाच किस्सा आमिरने नुकताच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे.

आणखी वाचा : ‘आशिकी’फेम राहुल रॉय रुग्णालयात असताना सलमान खानने केलेली ‘अशी’ मदत; अभिनेत्याच्या बहिणीचा खुलासा

आमिर म्हणाला, “तंत्रज्ञान आणि माझा दूरदूरवर संबंध नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. १९९६ दरम्यान मी आणि शाहरुख एका शो निमित्त परदेशात होतो. त्यावेळी ‘तोशिबा’ कंपनीचा एक नवा कोरा लॅपटॉप बाजारात आला होता. शाहरुख त्यावेळीही यासाठी प्रचंड उत्सुक होता. त्यावेळी मला लॅपटॉपची फारशी गरज वाटत नव्हती. तेव्हा शाहरुखने तोच लॅपटॉप माझ्यासाठीही घेतला,”

पुढे आमिर म्हणाला, “५ वर्षांनी जेव्हा माझ्या एका नव्या मॅनेजरने तो बाजूला ठेवलेला लॅपटॉप मागितला तेव्हा मी त्याला तो वापरायला दिला, पण तो लॅपटॉप तेव्हा सुरूच झाला नाही. तब्बल ५ वर्षं मी त्या लॅपटॉपला हातही लावला नव्हता.” एकमेकांचे चांगले मित्र असूनही अद्याप या दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. आशुतोष गोवारीकरच्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा अन् शेवटचं एकत्र दिसले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan didnt opened laptop for five years given as a gift by shahrukh khan avn