हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. यात अनेकांना बेघर होण्याची, तर अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली. पूरग्रस्त भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे केला जात आहे. बॉलीवूड अभिनेता आमिर खाननेही हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी २५ लाख रुपये दान केले आहेत.
हेही वाचा- ‘जब वी मेट’ चित्रपटात चष्मा लावण्यासाठी शाहिद कपूरने केलेलं भांडण; म्हणाला, “आधी निर्मात्यांना…”
आमिर खानच्या या मदतीनंतर हिमाचलचे मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंग सिक्सू यांनी अभिनेत्याचे आभार मानले आहेत. सुखविंदर सिंग म्हणाले की या पैशाचा वापर पूरग्रस्त भागातील लोकांची मदत आणि त्यांचा पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी वापरला जाईल.
हेही वाचा- परिणीती-राघव यांच्या लग्नाला प्रियांका चोप्रा राहणार गैरहजर? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खान शेवटचा दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. यासोबतच या चित्रपटाला प्रचंड टीकेलाही सामोरे जावे लागले होते. दरम्यान, या चित्रपटानंतर आमिर खानने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
तर दुसरीकडे आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने दिग्दर्शित केलेल्या ‘मिसिंग लेडीज’ या चित्रपटाला टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मिसिंग लेडीज’ चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ८ सप्टेंबर रोजी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाच्या भव्य प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते.