आमिर खानची मुलगी आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे अलीकडेच विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. रविवारी नववधू आयराने तिच्या नोंदणीकृत लग्नातील अनेक फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या.
“प्री वेडिंग कॉफी फिक्स” असे कॅप्शन देत तिने पहिला फोटो शेअर केला. तर “मला नेहमी गांभीर्याने घेतल्याबद्दल धन्यवाद” असे म्हणत माईकसह सराव करतानाचा आणि लग्नातला फोटो तिन स्टोरीवर अपलोड केला. पुढे आमिर खानचा भावनिक फोटो शेअर करत आयराने ‘खोटे अश्रू’ असं मजेशीर कॅप्शन दिलं.
हेही वाचा… शाहरुख खानबरोबर वादाच्या चर्चा, ‘दिलवाले’नंतर एकत्र काम न करण्याबाबत रोहित शेट्टी म्हणाला…
आयराने तिचा प्रियकर आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न केलं. रविवारी (२१ जानेवारी) आयराने लग्नातील समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. या संपूर्ण समारंभात आयराचे आई-वडील आमिर खान आणि रीना दत्ता तिच्या आनंदात सहभागी झाले होते.
हेही वाचा… मुलीच्या लग्नानंतर आमिर खान दुसऱ्या पत्नीबरोबर रोड ट्रीपवर; किरण रावने शेअर केलेले फोटो चर्चेत
आणखी एक फोटो शेअर करत तिने लिहिले, “एवढ्यात गाणी लावायची घाई करू नका…कारण, अजून लग्नाची संपूर्ण प्रक्रिया बाकी आहे.”
आयरा खानच्या लग्नाचे नवीन फोटो

(Photo: Ira Khan/Instagram)

(Photo: Ira Khan/Instagram)
आयरा खानच्या लग्नातील फोटोमध्ये तिच्या आई-वडिलांसह तिचा भाऊ जुनैद आणि बहीण झेन मेरी यांची झलक पाहायला मिळाली. नोंदणीकृत विवाहानंतर, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी ८ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. राजस्थानमधील ताज लेक पॅलेजमध्ये या दोघांची रिसेप्शन पार्टी पार पडली होती.