Reena Datta Father Passed Away : अभिनेता आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला खान कुटुंबीय उपस्थित होते. रीना दत्ता व खान कुटुंबाने साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रीना दत्ताच्या वडिलांचे २ ऑक्टोबर रोजी निधन झाले. या कठीण काळात आमिर खान त्याच्या माजी पत्नीला सांभाळताना दिसत आहे. आज रीनाच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी आमिरचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. आजोबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आमिर व रीनाचं मुलं जुनैद खान आणि आयरा खान तसेच आयराचा पती नुपूर शिखरे उपस्थित होता.

हेही वाचा – दिग्दर्शकाने सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ताशी लग्न केलं होतं. रीना दत्ता हिंदू कुटुंबातील आहे. लग्नानंतर दोघेही आपापल्या धर्माचे पालन करत होते. रीनाचे वडील हवाई दलाचे माजी अधिकारी होते. रीनाच्या वडिलांना तिचं व आमिरचं लग्न मान्य नव्हतं, असं म्हणतात. दोघेही लग्नानंतर १६ वर्षांनी २००२ मध्ये विभक्त झाले होते.

हेही वाचा – Video: “अरबाजने सॉरी म्हटल्यावर लगेच तू त्याच्या गळ्यात पडणार” म्हणत सूरजने निक्कीला लगावला टोला अन् लावली ट्रॉफीची पैज

आमिरने नंतर किरण रावशी लग्न केलं हों, तर रीनाने मात्र आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिने पुन्हा लग्न केलं नाही. आमिरचं दुसरं लग्नही मोडलं. आमिर व त्याच्या दोन्ही पत्नी एकाच इमारतीत राहतात. त्याची लेक आयराच्या लग्नात संपूर्ण खान कुटुंबीय एकत्र आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan first wife reena datta father passed away hrc