अभिनेता आमिर खान अनेक वर्षांपासून अवॉर्ड शोजना जाणे टाळत आला आहे. १९९० च्या दशकात त्याच्या सिनेमांनी चांगली कमाई करूनसुद्धा अनेक अवॉर्ड शोमध्ये त्याला पुरस्कार न मिळाल्याने आमिरने अवॉर्ड शोला जाणे बंद केले होते. मात्र, आता अनेक वर्षांनंतर आमिर खानने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ या आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्याला आमिर खानने हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चा चौथा सीझन जेद्दाह (सौदी अरेबिया) येथे भव्य स्वरूपात सुरू झाला आहे. या फेस्टिवलमध्ये हॉलीवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.

हेही वाचा…Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री

या वर्षी फेस्टिव्हलच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे ऑस्कर नामांकित अभिनेत्री एमिली ब्लंट हिला ‘रेड सी ऑनरी अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. तिला आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. हॉलीवूडच्या एमिली ब्लंटबरोबरच बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि हॉलीवूड ॲक्शन हिरो विन डिझेल यांनाही या फेस्टिव्हलमध्ये गौरवण्यात आले.

अभिनेत्री ईवा लाँगोरियाने आमिर खानची ओळख करून दिली. ती आमिरची कायमच प्रशंसक राहिली असून तिने ‘लगान’, ‘३ इडियट्स’ आणि ‘दंगल’ यांसारख्या त्याच्या चित्रपटांचे विशेष उल्लेख करून जागतिक चित्रपटसृष्टीसाठी त्याच्या योगदानाचे कौतुक केले. आमिरने हा सन्मान स्वीकारताना सांगितले की, “इतक्या प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये सन्मानित होणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

हेही वाचा…घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई

आमिर खानने अनेक वर्षानंतर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्याने नेटकरी अवाक झाले आहेत. बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला तो पुरस्कार सोहळ्याला का जात नाही ? असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर आमिरने त्याच्यासाठी कुठल्याही पुरस्कार सोहळ्यापेक्षा प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम हाच खरा पुरस्कार आहे असे सांगितले होते.

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला करिना कपूरचीही उपस्थिती

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या भव्य रेड कार्पेटवर हॉलीवूड आणि बॉलीवूड कलाकारांनी शोभा वाढवली. मिशेल योह, सिंथिया एरिव्हो, ईवा लाँगोरिया, मायकेल डग्लस यांसारख्या हॉलीवूड स्टार्सबरोबर बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूरही उपस्थित होती. करीनाने आपल्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा…खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि जबरदस्त ट्विस्ट; ‘या’ वीकेंडला नेटफ्लिक्सवर पाहता येतील चोरींवर आधारित ‘हे’ पाच सिनेमे

८० देशांतील १२२ चित्रपटांचा महोत्सव

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल १४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, त्यामध्ये ८० देशांतील १२२ चित्रपट सादर केले जाणार आहेत. या फेस्टिवलचा उद्देश दुर्लक्षित प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि विविध संस्कृतींमधील संवाद वाढविणे आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan honored with prestigious award at red sea international film festival psg