परफेक्शनिस्ट आमिर खान आणि चित्रपट निर्माती किरण राव १५ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये वेगळे झाले. त्यांच्या मुलाचा (आझादचा) ते दोघे मिळून सांभाळ करतात. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत किरण रावने आझादला कोणताही त्रास होऊ न देता, सहजपणे घेतलेल्या त्यांच्या घटस्फोटाविषयी सांगितले.
डीएनएला दिलेल्या मुलाखतीत, किरण राव आणि आमिर खानला त्यांच नातं का बदलावंसं वाटलं? याबाबत किरण रावने खुलासा केला. किरण राव म्हणाली, “घटस्फोट आणि माझं प्रोफेशन या दोन्ही माझ्या वैयक्तिक गोष्टी मी सहजपणे सांभाळू शकले. आम्हाला आमच्या नात्याची व्याख्या बदलायची आहे, असा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. आम्ही सहजरीत्या वेगळे झालो. कारण- सर्वांसमोर वेगळं होण्याचा निर्णय घेऊन आम्हाला आझादला दुखवायचं नव्हतं.”
हेही वाचा… लंडनमध्ये लेक वामिकासह विराट कोहली दिसला एकत्र, फोटो झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले, “अनुष्का…”
वेगळं होण्याचा निर्णय त्यांनी कोरोनाच्या काळात घेतल्यामुळे एकाच ठिकाणी राहून घटस्फोटाचा निर्णय घेण्यास त्यांना मदत झाली. किरण म्हणाली, “आम्ही खूप नशीबवान होतो. कारण- आम्ही दोघेही त्यावेळी एकाच घरात राहत होतो. त्या निर्णयानंतरही आमचं आयुष्य तेवढं बदललं नाही.”
किरण पुढे म्हणाली, “कोविडमुळे आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. आम्ही एकत्र काम करतोय. कामासाठी एकमेकांवर अजूनही अवलंबून आहोत याची मला खूप कदर आहे.”
हेही वाचा… १० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बांधणार लग्नगाठ; अभिनेत्री म्हणाली, “अत्यंत साधं…”
दरम्यान, किरणच्या कामाबद्दल सांगायचे झाले, तर किरण सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘लापता लेडीज’च्या प्रतीक्षेत आहे. १ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “जेव्हा आमचा घटस्फोट होत होता, त्या काळात हा चित्रपट लिहिला गेला आणि तयार करण्यात आला. बाकीच्या जोडप्यांसाठी हा काळ खूप कठीण गेला असता; परंतु आमिर आणि माझ्यासाठी हे सगळं सोपं होतं” असे किरणने नमूद केले.