Ira Khan Nupur Shikhare Wedding : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लाडकी लेक आयरा खान अखेर लग्नबंधनात अडकली आहे. आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दोघांचेही बुधवारी (३ जानेवारी २०२४ रोजी) नोंदणी पद्धतीने लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
आयरा व नुपूरच्या लग्नाला आमिर खानच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता व किरण राव यांनी हजेरी लावली. तसेच त्यांची दोन्ही मुलं जुनैद व आझाददेखील उपस्थित होते. आयरा व जुनैद ही रीना व आमिरची अपत्ये आहेत. तर आझाद हा आमिर व किरणचा मुलगा आहे. आयरा व नुपूरच्या लग्नाला खान कुटुंब एकत्र आलं होतं. त्यांनी नवविवाहित जोडप्याबरोबर पोज देत फॅमिली फोटोही काढले.
आयरा व नुपूरच्या नोंदणी पद्धतीच्या लग्नानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळा झाला. यावेळी मंचावर आयरा व नुपूरसह रीना दत्ता, जुनैद, किरण राव, आझाद आणि नुपूरची आई प्रीतम शिखरे उपस्थित होते. आमिरही तिथेच होता. मंचावर आमिर किरणजवळ गेला आणि तिच्या गालावर किस केले. यावेळी जुनैदने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. आमिर व किरणचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
दरम्यान, नुपूर व आयराचे लग्न व रिसेप्श वांद्रेमधील ताज लँड्स एंड याठिकाणी पार पडले. त्यांच्या लग्नाला मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी हजेरी लावली होती. याशिवाय दोन्ही कुटुंबियांकडून आलेल्या पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. आयरा व नुपूर यांना सहजीवनासाठी चाहते व सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत.