बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने विविध भूमिका साकारत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच मन जिंकलं. या मिस्टर परफेक्शनिस्टचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. कोणत्याच अवॉर्ड शो, पार्टीजला न जाणाऱ्या या अभिनेत्याने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये उपस्थिती दर्शवली होती. या शोदरम्यान अभिनेत्याने अनेक किस्से सांगितले, अनेक गोष्टींचा उलगडा केला. ‘पीके’ चित्रपटामधील न्यूड सीनबद्दलही आमिरने यात खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पीके’ चित्रपटातील सीनबद्दल सांगताना आमिर म्हणाला, “राजू आणि अभियाजने ही गोष्ट लिहिली होती की, एक एलियन येतो, जो नग्न अवस्थेत असतो. तो एका माणसाला पाहतो आणि त्याच्याकडे धावत जातो. गोष्ट ऐकताच मी राजूला विचारलं होतं की, हे खरोखर शूट कसं होणार आहे? तू मला नग्न करणार आहेस का? नक्की माझ्याबरोबर तू काय करणार आहेस?”

तर यावर राजू म्हणाला होता, “मी तुला परिधान करता याव असं छोटं शॉर्ट्ससारखं काहीतरी बनवेन आणि त्याने सांगितलं की ते फक्त तुला पुढे वापरता येईल, मागच्या बाजूला आपल्याला काही वापरता येणार नाही.”

हेही वाचा… अखेर ६१ तासांनी सुरू झालं सोनू सूदचं व्हॉट्सॲप, आले तब्बल ९ हजारांहून अधिक मेसेज; अभिनेता म्हणाला…

“जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना तेव्हा ओटीपोटाचं गार्ड (abdominal guard) असतं, तर तशाचप्रकारचं ओटीपोटाचं गार्ड त्यांनी बनवलं होतं. राजूने मला हेसुद्धा सांगितलं होतं की, आपण वाळवंटामध्ये शूट करणार आहोत. ती जागा खूप दूर असणार आहे आणि तिकडे माणसंही कमी असणार आहेत. तू टेन्शन नको घेऊस. सेटवर जास्त कोणी माणसं नसतील. आपली युनिटची माणसंदेखील नसणार आहेत. जी मर्यादित माणसं आपल्याला हवीत, तिच असणार आहेत. तर तू चिंताग्रस्त राहा.”

“शूटिंगच्या दिवशी मी कॉस्ट्यूम डिझायनरने बनवलेलं ते गार्ड घातलं होतं, मी ते घालून रेडिओ घेऊन बाहेर आलो. त्यादिवशी राजूने सर्वांचे फोन लपवले होते, जेणेकरून कोणी फोटो काढणार नाही.”

“सीनमध्ये मला इकडून तिकडे पळायचं होतं. जोपर्यंत मी चालतोय तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण जेव्हा मी धावायचो तेव्हा ते गार्ड निघून जायचं. कारण ते चिकटपट्टी लावून चिपकवलेलं होतं आणि मी हळू हळू धावू शकत नव्हतो. त्या सीनदरम्यान मला खूप त्रास होत होता. कारण मला खूप वेगात धावायचं होतं आणि मी ते करू शकत नव्हतो.”

हेही वाचा… “…तर माझं नावच बदला”, ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार दहा दिवसांत पाच किलो वजन कमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

“एक दोन वेळा प्रयत्न केल्यानंतर मी राजूला सांगितलं, राजू यार काढून टाक ते गार्ड. मला सीन नीट द्यायचा आहे; तर तेव्हा मी ते गार्ड काढून फेकून दिलं. तेव्हा माझ्या शरीरावर कोणतच वस्त्र नव्हतं. मी असाच पळत सुटलो होतो.”

“जसजशी शूटिंग जवळ येत होती, मी त्या सीनबद्दल रात्री विचार करत बसायचो आणि मला तेव्हा खूप लाजिरवाणं वाटायचं. मला वाटायचं सेटवर नग्न अवस्थेत फिरेन तर मी किती विचित्र दिसेन. कारण आपल्याला या सगळ्याची सवय नसते. तेव्हा मला खूप टेन्शन यायचं की, कसं होईल? तेव्हा सगळे आपल्याला बघत असताना कधी चुकून ते गार्ड निघालं तर काय होईल? मला या सगळ्या विचारानेच खूप लाजिरवाणं वाटत होतं.”

हेही वाचा… बोमण इरानींच्या गाडीत बसल्यानंतर नम्रता संभेरावला मिळाला आयुष्यभर जपणारा ‘तो’ अनुभव; म्हणाली, “मी पहिल्यांदा बीएमडब्ल्यूमध्ये…”

“पण, आईशप्पथ सांगतो, जेव्हा मी सेटवर आलो ना तेव्हा मला फक्त काम करायचं होतं आणि माझा सीन नीट येत नव्हता. मग मी राजूला म्हणालो, राजू या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जरी तू मला नग्न अवस्थेत बघितलं, तरी काय फरक पडतो? आपल्याला तो सीन व्यवस्थित हवाय आणि त्यानंतर माझा सीन झाला, तेव्हा मला अजिबात लाजिरवाणं वाटलं नाही. “

दरम्यान, आमिर खान ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. आमिर खानबरोबर जिनिलिया डिसूजा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan on pk nude scene actor said i was running naked in the great indian kapil show dvr