२००३ साली प्रदर्शित झालेला ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली होती. तर हा चित्रपट दिग्दर्शित राजकुमार हिरानी यांनी केला होता. या चित्रपटात संजय दत्त(Sanjay Dutt), अर्शद वारसी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. संजय दत्तने मुंबईचा गँगस्टर मुन्ना भाईची भूमिका साकारली होती. तर अभिनेता अर्शद वारसी सर्किट या भूमिकेत दिसला होता. २००६ साली मुन्ना भाईचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटात देखील हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते.
ज्या दिवशी तो मला स्क्रीप्ट…
आमिर खान(Aamir Khan)ने नुकतीच मुंबईमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.यावेळी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाविषयी बोलताना त्याने म्हटले, “जेव्हा राजूने स्क्रीप्ट लिहिली तेव्हा त्या चित्रपटाचा भाग मी असावे, असे त्याला वाटत होते. ज्या दिवशी तो मला स्क्रीप्ट सांगण्यासाठी आला. त्यावेळी त्याने मला म्हटले की मी तुला चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये सांगणार होतो. त्यामध्ये बदल झाला आहे आणि ती आता मुन्ना भाई २ म्हणजेच लगे रहो मुन्ना भाईची स्क्रीप्ट आहे. त्यामुळे माझ्याकडे आता तुला सांगण्यासाठी कोणतीही स्क्रीप्ट नाही.”
आमिर खानने पुढे म्हटले, “मी त्याला मूळ गोष्ट काय होती , असे विचारले. त्याने मला सांगितले की भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी एक तरूण असतो. जो स्वातंत्र्यसेनानी आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळीत सहभागी होत असे. एकदा लाठीचार्जदरम्यान त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तो कोमात जातो. त्यानंतर त्याला ४०-४५ वर्षानंतर त्याला शुद्ध येते. यादरम्यानच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालेले असते. परंतु तो अजूनही त्या काळात अडकलेला वाटतो, म्हणूनच तो गांधीजींशी बोलतो. त्याला माहितच नसते की गांधीजींची हत्या झाली आहे. ही चित्रपटाची खरी स्क्रीप्ट होती.”
आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटात एकत्र काम केले नसले तरी त्यांनी त्यानंतर दोन चित्रपटात एकत्र काम केले. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ३ इडियट्स आणि आणि २०१४ साली प्रदर्शित झालेल्या पीके मध्ये त्यांनी एकत्र काम केले. विशेष बाब म्हणजे हे दोन्हीही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले.
‘लगे रहो मुन्ना भाई’ हा चित्रपट फक्त १५ कोटी रुपयांमध्ये बनला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने भारतात ८५ कोटी रुपये आणि जगभरात १२५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाला चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाले. दिलीप प्रभावळकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट पटकथा, स्वानंद किरकिरे यांच्यासाठी बंदे में था दम या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते.
दरम्यान, लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटात अभिनेत्री दिया मिर्झा, विद्या बालनदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसल्या आहेत.