बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. यानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घ्यायचं जाहीर केलं अन् यापुढे तो चित्रपटांची केवळ निर्मिती करणार हेदेखील मध्यंतरी त्याने स्पष्ट केलं होतं.
प्रेक्षक आमिर कधी अभिनयात कमबॅक करणार याकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच आमिरच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल नवी माहिती समोर आली आहे. आमिर लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, इतकंच नव्हे तर तो यात अभिनयदेखील करताना दिसणार आहे. ‘न्यूज १८ इंडिया’च्या अमृत रत्न २०२३ या कार्यक्रमात आमिरने त्याच्या या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे.
आणखी वाचा : KYC अपडेट करण्याच्या नावाखाली आफताब शिवदासानीची फसवणूक; अभिनेत्याचे लाखोंचे नुकसान
आमिर म्हणाला, “मी सितारे जमीन पर या चित्रपटाची निर्मिती करत असून त्यात अभिनयही करणार आहे. ‘तारे जमीन पर’च्या १० पावलं पुढे जाऊन हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. आधीच्या चित्रपटाने तुम्हाला भावुक केलं होतं, हा चित्रपट मात्र तुम्हाला हसवणार आहे. आधीच्या चित्रपटात मी दर्शीलच्या पात्राची मदत केली होती. या नव्या चित्रपटात नऊ लोक त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांसकट माझी मदत करताना पाहायला मिळणार आहे.”
याचदरम्यान आमिरने त्याच्या निर्मितीबद्दलही खुलासा केला. तो म्हणाला, “मी निर्माता म्हणून ३ चित्रपट करत आहे. त्यापैकी एक ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण राव करणार आहे. दूसरा चित्रपट हा माझा मुलगा जुनैदचा आहे आणि तिसरा चित्रपट ‘लाहोर १९४७’ हा आहे ज्यात मी राजकुमार संतोषी व सनी देओलसह काम करणार आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे.”