‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने बॉलीवूडमधून मोठा ब्रेक घेतला होता. या काळात त्याने चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. याशिवाय आमिर खान पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ उपक्रमातदेखील व्यग्र होता. मात्र, आता तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर आमिर खान पुन्हा मोठ्या पडद्यावर परत येण्याच्या तयारीत आहे. ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटातून त्याचे पुनरागमन होणार आहे.

आमिर खान प्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारू शकतो अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहेत, तर भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माते असतील. सध्या आमिर खान, अनुराग बसू आणि भूषण कुमार यांच्यात या प्रोजेक्टसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा…“तुला दोन आई आहेत ना? “, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी ईशा देओलला विचारलेला प्रश्न; अभिनेत्रीने म्हणाली होती, “आजपर्यंत मला…”

किशोर कुमार यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक अमित कुमार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले, “काहीही निश्चित झालेले नाही, आमच्या कायदेशीर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आम्ही याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही.”

यापूर्वी, ‘पिंकविला’ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले होते , “किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित हा विषय अनुराग बसू आणि भूषण कुमारच्या हृदयाजवळ आहे. आमिर खानही किशोर कुमार यांचा मोठा चाहता आहे .”

हेही वाचा…“मला त्या अवतारात बघून…”, झीनत अमान यांनी सांगितली राज कपूर यांच्याविषयी आठवण; म्हणाल्या, “मूठभर सोन्याच्या…”

या सूत्राने पुढे सांगितले, “आमिरने सहा चित्रपटांच्या कथा वाचल्या असून तो या चित्रपटांपैकी काही सिनेमे करण्याचा विचार करतोय. यात किशोर कुमार यांच्यावरील सिनेमाच्या स्क्रिप्टसह, आमिर उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आणि राजकुमार संतोषी आणि झोया अख्तरच्या आगामी सिनेमाची स्क्रिप्ट वाचत असून तो यातील काही सिनेमांना होकार देऊ शकतो.”

हेही वाचा…महानायक अमिताभ बच्चन, शशी कपूर यांचा सल्ला टाळून ‘या’ अभिनेत्यानं सोडलं होतं बॉलीवूड

आमिर खान नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने अमिताभ बच्चन यांना गमतीने विचारले की, “तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवते का?” अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिलं, ‘३ जून १९७३’ यावर आमिरने मिश्कीलपणे म्हटलं, “सिद्ध करून दाखवा, पुरावा दाखवा.” या संवादावर अमिताभ बच्चन क्षणभर गोंधळले, पण आमिरने लगेचच खुलासा केला की, “माझ्याकडे पुरावे आहेत, तुमच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका माझ्याकडे आहे.” या मजेदार प्रसंगावर अमिताभ बच्चन हसले.