परफेक्शनिस्ट म्हणून सुप्रसिद्ध असणारा आमिर खान त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच आमिरनं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. या शोदरम्यान त्यानं अनेक किस्से सांगितले. कॉलेजचा विद्यार्थी ते एक सुपरस्टार, असा हा आमिरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. नाटक, शॉर्ट फिल्म करीत आमिरनं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. पहिल्या नाटकातून, तर त्याला काढून टाकलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “मी चुकून अभिनेता झालो आहे. कारण- मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक नाटकाचा ग्रुप होता आणि मला नाटकात काम करण्याची आवड होती. तेव्हा महेंद्र जोशी नावाचे एक दिग्दर्शक होते आणि त्यांच्याबरोबर मला काम करायची खूप इच्छा होती. कॉलेजच्या एका नाटकात मला संधी मिळाली नाही कारण- मी ऑडिशनमध्ये फेल झालो होतो; पण मी कधीच हार मानली नाही. तेव्हा ‘गुजराती नाटकाची तालीम सुरू होणार आहे’, असं नोटीस बोर्डवर मी वाचलं आणि मी त्या नाटकासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

मला गुजराती, मराठी येत नाही; पण गुजराती नाटकात कोरसमध्ये मला संधी मिळाली. त्या संपूर्ण नाटकात मला एक ओळ दिली होती. पूर्ण नाटकात आणि कोरसमध्ये एकच असा माणूस होता; ज्याच्या तोंडी एकच ओळ होती आणि ती ओळ म्हणजे एक शिवी होती. मी ती एक ओळ तीन महिने सराव करून पाठ केली होती; पण ‘महाराष्ट्र बंद’ असल्यामुळे मला तालमीला जाता आलं नाही. कारण- त्या दिवशी आईनं बाहेर जायला मनाई केली होती.

दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक महेंद्र जोशी यांनी मी तालमीला का नाही आलो याबद्दल विचारलं. तर मी सांगितलं ‘महाराष्ट्र बंद’ होता म्हणून आईनं पाठवलं नाही. बाकीचे तर आलेले; तू नाही आलास, असं म्हणत त्यांनी मला नाटकातून काढून टाकलं.”

हेही वाचा… “…तुझी नाटकं बंद कर”, भर रेस्टॉरंटमध्ये चाहत्याशी उद्धट वागली होती काजोल; पोस्ट व्हायरल

“नाटकाची तालीम सुरू झाली होती आणि समोर बसून मी रडत होतो. मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. इतक्यात तिकडून निरंजन थाडे आणि इंद्रजित सिंग बन्सल ही दोन माणसं आली, त्यातील निरंजन माझा मित्र होता. तेव्हा निरंजन मला म्हणाला की, इंद्रजित पुणे इन्स्टिट्यूटमध्ये एक डिप्लोमा फिल्म बनवतोय. त्याला अभिनेत्याची गरज आहे. तुला थोडा वेळ आहे का? मी त्याला म्हटलं की, मी आताच मोकळा झालो. तो म्हणाला की, आजच्या आज तुला पुणे इन्स्टिट्यूटला जायचं आहे.”

हेही वाचा… “दोनवेळचं जेवण मिळायचं नाही”, अभिजीत खांडकेकरने सांगितला पहिल्या मालिकेतील ‘तो’ अनुभव, म्हणाला…

“मी घरी गेलो आणि आईला सांगितलं की, काही कामासाठी मला जायचंय. एशियाड बसमध्ये बसून निघालो. तिथे शूटिंग झाली. नंतर माझं हे काम एका एडिटिंगच्या विद्यार्थ्यानं पाहिलं. त्याचं नाव होतं राजीव सिंग. त्यानंतर राजीव सिंगनं मला चित्रपट ऑफर केला आणि तो मी केला. ते दोन्ही चित्रपट पाहून केतन मेहता यांनी मला ‘होळी’मध्ये कास्ट केलं आणि होळी चित्रपट पाहिल्यानंतर मन्सूर आणि नासिर साहेबांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्या दिवशी जर ‘महाराष्ट्र बंद’ नसता, तर माहीत नाही की, मी स्टार झालो असतो की नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan shared his acting journey connected to maharashtra bandh in the great indian kapil show dvr