मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान आमिरने अनेक गोष्टींचा उलगडा केला. चित्रपटातील अनुभव, करिअरची सुरुवात ते अगदी वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टीदेखील त्याने शेअर केल्या. या कार्यक्रमाला आमिर खानच्या दोन्ही बहिणी निखत खान आणि फरहत खानदेखील उपस्थित होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिरच्या काही चित्रपटांदरम्यान घडलेले असे खास अनुभव आहेत. २३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटासाठी आमिर खान पंजाबला गेला होता. तिथली संस्कृती आणि आदरातिथ्य पाहून तो भारावून गेला. याचाच अनुभव आमिरने या मुलाखतीत शेअर केला आहे.

हेही वाचा… “मी असाच पळत सुटलो होतो”, पीकेमधल्या ‘त्या’ न्यूड सीनबद्दल आमिर खानने केला खुलासा, म्हणाला…

आमिर खान म्हणाला, “ही अगदी माझ्या ह्रदयाजवळची गोष्ट आहे. आम्ही पंजाबमध्ये ‘रंग दे बसंती’साठी शूटिंग केलं आणि मला तिकडचं वातावरण खूप आवडलं होतं. पंजाबी संस्कृती आणि तिथली लोकं अत्यंत प्रेमळ आहेत. तर पंजाबमध्ये मी जेव्हा ‘दंगल’च्या शूटिंगसाठी एका लहान गावामध्ये गेलेलो, तेव्हा आम्ही जेमतेम दोन ते अडीच महिने त्याच घरात, त्याच लोकेशनवर शूट करत होतो. माझी तेव्हा ७ ची शिफ्ट असायची आणि मी कधी कधी सकाळी ६ वाजता पोहोचायचो, तर कधी कधी ५ वाजता पोहोचायचो. सकाळी सकाळी ५ वाजताच्या सुमारास मी त्या गावात प्रवेश करतोय आणि त्या गावात प्रत्येक घराबाहेर त्या त्या घरातले लोक फक्त माझं स्वागत करायला उभे राहायचे.”

“अडीच महिने त्यांच्या घराजवळून माझी गाडी जायची आणि दररोज सकाळी ते नमस्कार करून मला ‘सत श्री अकाल’ करायचे. ते माझं स्वागत करण्यासाठी वाट बघायचे. ते मला कधी त्रासही नाही द्यायचे, ना कधी माझी गाडी अडवायचे. ते रोज हात जोडून माझं स्वागत करायचे. संध्याकाळी ६ वाजता माझं पॅकअप व्हायचं, तेव्हाही त्या गावातला प्रत्येक जण बाहेर असायचा आणि मी जात असताना सगळे मला शुभ रात्रीच्या शुभेच्छा द्यायचे, हे असं अडीच महिने चाललं होतं.”

हेही वाचा… अखेर ६१ तासांनी सुरू झालं सोनू सूदचं व्हॉट्सॲप, आले तब्बल ९ हजारांहून अधिक मेसेज; अभिनेता म्हणाला…

“मी मुस्लीम कुटुंबातला आहे, म्हणून माझी सवय हात जोडायची नाही तर माझी सवय वेगळी आहे. मी पंजाबला गेलो ना, त्या अडीच महिन्यानंतर मला नमस्कार करण्यामागची ताकद कळाली. ही खरंच एक खूप अद्भुत भावना आहे.

“पंजाबमध्ये बघितलं तर प्रत्येक माणूस सहा फूटाचा आहे. पण, व्यक्ती लहान असो वा मोठा असो, प्रत्येकाला ते तेवढंच प्रेम देतात आणि त्यांची तेवढीच इज्जत करतात.”

हेही वाचा… “…तर माझं नावच बदला”, ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार दहा दिवसांत पाच किलो वजन कमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, आमिर खान ‘सितारे जमीन पर’या आगामी चित्रपटात झळकणार आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खानसह जिनिलिया देशमुख प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan shared in the great indian kapil show that he felt power of namastey while dangal shoot dvr