बॉलिवूडमधील नेपोटीजम याविषयी आजवर बरीच चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर तर हा वाद कायम सुरूच असतो. एखाद्या स्टारकीडला मिळणारी संधी आणि त्यामुळे त्यांचं ट्रोल होणं हे अगदीच आपल्यासाठी नेहमीचं झालं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटीजमच्या वादाला एक वेगळं वळण मिळालं. याबद्द बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनीसुद्धा भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता आणखी एक नेपोकीड लवकरच इंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आल्याची बातमी समोर आली आहे. सुपरहिट साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जुनैद खानला साईन केल्याचे म्हंटले जात आहे. तमिळ हिट चित्रपट ‘लव्ह टुडे’च्या हिंदी रिमेकमध्ये आमिर खानचा मुलगा मुख्य भूमिका निभवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : परिणीती चोप्रा ‘आप’ नेते राघव चड्ढा यांना करतीये डेट? व्हायरल फोटोज पाहून नेटकऱ्यांचा सवाल

‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार, आमिरचा मुलगा जुनैद याला या चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला असून त्याचं कास्टिंग लवकरच फायनल होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘लव्ह टुडे’ हा चित्रपट गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे १५० कोटींची कमाई केली होती. तमिळ चित्रपटात प्रदीप रंगनाथन आणि इवाना मुख्य भूमिकेत होते. प्रदीपने चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले होते.

जुनैदने यापूर्वी यशराज बॅनरच्या ‘महाराजा’ चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याशिवाय जुनैदने आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘प्रीतम प्यारे’ या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. याबरोबरच त्याने ‘लाल सिंह चड्ढा’च्या मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.जुनैदने अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स, लॉस एंजेलिसमधून शिक्षण घेतले आहे. आता लवकरच तो या रिमेक चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होईल ही अपेक्षा प्रेक्षकांना आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan son junaid khan bollywood debut with this remake of superhit tamil movie avn