बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा रुपेरी पडद्यापासून लांब असला तरी तो चर्चेत असतो. लवकरच आमिरचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’ हा २०२४ मध्ये प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अजून या चित्रपटाबद्दल चर्चा होत असतानासुद्धा जुनैदच्या दुसऱ्या चित्रपटाचीही जोरदार हवा होत आहे. आपल्या दुसऱ्या चित्रपटात जुनैद एका दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच या चित्रपटाच्या सेटवरील फोटोजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमिर खान प्रोडक्शन या बॅनरखाली बनणाऱ्या जुनैद खानच्या चित्रपटाचा सेट हा जपानच्या साप्पोरो स्नो फेस्टिवलमध्ये लावण्यात आला आहे. या सेटवरील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यात जुनैद तिच्या अभिनेत्रीसह पाहायला मिळत आहे. यात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीदेखील जुनैदसह काम करणार आहे.

आणखी वाचा : मराठी चित्रपट का चालत नाही? विजू मानेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “बऱ्याच मंडळींना वाटतं की…”

बर्फ पडत असल्याने चित्रपटाचे चित्रीकरण थोडे लांबले आहे. सोशल मीडियावर समोर येणाऱ्या फोटोजमधून हे स्पष्ट होत आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे चित्रीकरणात अडथळा येत आहे. या चित्रपटात जुनैद साई पल्लवीसह रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या फ्रेश जोडीला स्क्रीनवर पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. अद्याप या चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

चित्रपटात येण्याआधी जुनैदने तब्बल सात वर्षे रंगभूमीवर अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं असून त्याने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट एका ऐतिहासिक महाकाव्यावर बेतलेला असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जुनैदची बॉलिवूडमध्ये चर्चा व्हायला लागली आहे. आमिरचा मुलगा नेमका पडद्यावर काय कमाल दाखवतो ते आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan son junaid khan to be paired with south actress sai pallavi in his first film avn