बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी आमिर खानबद्दल भाष्य केलं आहे.

आमिर खान मागच्या वर्षी लाल सिंग चड्ढा चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट फारसा चालला नाही, यानंतर आमिरने करियरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही म्हणून त्याने ब्रेक घेतला आहे. आता आमिरचे दमदार कमबॅक करण्यासाठी राजकुमार संतोषी सज्ज झाले आहेत. नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले, “माझ्याकडे चित्रपटाचा विषय आहे. ‘लाल सिंग चड्ढा’च्या वेळी आमची भेट होणार होती, पण त्यानंतर त्यांनी चित्रपटातून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. पण एखाद्या दिवशी भेटलो तर मी त्यांना गोष्ट सांगेन आणि त्यांचा ब्रेक लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

Video : “मी तर सार्वजनिक…” चाहत्याच्या ‘त्या’ कृतीवर नीना गुप्तांनी व्यक्त केली खंत

आमिर खानने त्यांच्या अंदाज अपना अपना या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट कळत क्लासिक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात आमिरच्या बरोबरीने सलमान खानदेखील होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.

‘सर्कस’च्या अपयशानंतर सिद्धार्थ जाधव ‘या’ बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार; पोस्ट शेअर करत दिली माहिती

८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी यांनी आजवर ‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘अंदाज अपना अपना’सारखे चित्रपट दिले आहेत. त्यांचा ‘गांधी गोडसे’ चित्रपट या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

Story img Loader