काही कलाकार हे चाहत्यांसाठी आदर्श व्यक्ती असतात. अनेक जण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान(Aamir Khan) ने आपल्या तारुण्यात असे काही केले होते की, एका मुलाखतीदरम्यान त्याने मी आताच्या पिढीला असे वागण्याचा सल्ला देणार नाही किंवा अशा गोष्टी करण्यास प्रोत्साहन देणार नसल्याचे एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते.

१९९९ साली सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने याचा खुलासा केला होता. त्याला रक्ताने पत्र लिहिण्याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर आमिर खानने तसे केल्याची कबुली दिली होती. त्याने म्हटले होते की, मी एकदा असे केले होते. रीनाला माझे प्रेम पटवून देण्यासाठी मी तिला रक्ताने पत्र लिहिले होते, मात्र तिला तो प्रकार अजिबात आवडला नाही. माझे ते पत्र पाहून ती नाराज झाली होती. पण, प्रेमात इतका बुडालो होतो की मी काय करतोय याची जाणीव मला तेव्हा झाली नाही. याबाबत पुढे बोलताना त्याने म्हटले होते की, आता विचार केला की जाणवते, प्रेम व्यक्त करण्याची माझी पद्धत चुकीची होती. त्यावेळी मला समज नव्हती, बालिशपणामुळे या गोष्टी घडल्या. पण, आता जेव्हा मला चाहत्यांकडून रक्ताने लिहिलेली पत्रे येतात, जेव्हा तरुण मुले असे काहीतरी केल्याचे पाहायला, ऐकायला मिळते त्यावेळी चांगले वाटत नाही. तुमचे प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य नसून असे करण्याचा मी तरुणांना सल्ला देणार नाही, असे आमिर खानने या मुलाखतीत म्हटले होते.

aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Marathi Actor Shubhankar Ekbote Meets Aamir Khan
“जन्म १९९४, पहिला चित्रपट पाहिला…”, मराठी अभिनेत्याचं नाटक पाहायला आला आमिर खान! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
Aamir Khan
“सलग आठ चित्रपट फ्लॉप…”, आमिर खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले, “करिअर संपले…”
upasana singh rejected for maine pyar kiya role
“’मैने प्यार किया’साठी माझी निवड झाली होती पण…”, कॉमेडी नाइट्स विथ कपिल फेम अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानपेक्षा…”

हेही वाचा : Actress Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल, बोनी कपूर म्हणाले, “तिला..”

Aamir Khan आणि रीना दत्ता यांची प्रेमकहानी

याच मुलाखतीत आमिर खानने म्हटले होते की, मी आणि रीना लग्न करण्यासाठी पळून गेलो होतो. मी २१ आणि रीना १९ वर्षांची होती. आमच्या प्रेमाबद्दल घरच्यांना कल्पना नव्हती. मात्र, एकमेकांना गमावण्याच्या भीतीने आम्ही पळून गेलो. जेव्हा आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी मला २१ वर्षे पूर्ण झाली नसल्याने कायदेशीर लग्न करण्यासाठी आम्हाला वाट बघावी लागली. दरम्यान, आमिर खान आणि रीना दत्ता यांनी १६ वर्षे संसार केल्यानंतर २००२ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. रीना दत्ता यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर आमिरने किरण राव यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, हे लग्नदेखील फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी २०२१ मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, गेल्या काही काळापासून आमिर खान आपल्या मुलामुळे मोठा चर्चेत आहे. जुनैदने नुकतेच ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून त्याच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

Story img Loader