बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. आमिरची लाडकी लेक आयरा खान आज लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा मराठमोळा फिटनेस ट्रेनर नूपुर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. वांद्रे येथील ताज लँड एंड हॉटेलमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आयरा व नूपुर च्या लग्नाअगोदरच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. काल (२ जानेवारीला) दोघांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. तसेच बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरी आमिरची लाडकी लेक आयराच्या मेंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने आयरा व नूपुरचा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळचे मित्र व नातेवाईक त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आयरा व नूपुरच्या लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी एक खास नियम बनवण्यात आला आहे. हा नियम म्हणजे नो-गिफ्ट पॉलिसी. लग्नात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना आहेर न आणण्याची अट घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- Video: सलमान खानच्या घरी पार पडला आमिर खानच्या लेकीचा मेहेंदी कार्यक्रम, आयराच्या सावत्र आईसह भावांनी लावली हजेरी
आयरा व नूपुरने लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडून भेटवस्तू स्वीकारण्याऐवजी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे. टाइम्स इंडियाने दिलेल्या बातमीनुसार आयरा व नूपुरने लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तूंऐवजी ‘आगत्सू फाउंडेशन’ला देणगी द्यावी, अशी विनंती केली आहे. आयरा व नूपुरच्या या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.
आयरा व नूपुर मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नानंतर ६ ते १० जानेवारीदरम्यान दिल्लीत व जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीला बॉलीवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतील. आमिरने स्वतः अनेक कलाकारांना आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे.