विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा बुधवारी (१ नोव्हेंबर रोजी) ५० वा वाढदिवस होता. ऐश्वर्याने तिचा वाढदिवस लेक आराध्या आणि आईबरोबर साजरा केला. या तिघींनी एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी ऐश्वर्याने वाढदिवसाचा केक कापला. तसेच आराध्याने आई ऐश्वर्याला तिच्या वाढदिवशी तिच्या भाषणाच्या रूपात एक खास भेट दिली. आराध्या पहिल्यांदाच लोकांसमोर आणि मीडियासमोर बोलत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहरुख खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री चाहत्यांची गर्दी; SRK आभार मानत म्हणाला, “मी फक्त…”

आराध्या आई ऐश्वर्याबद्दल म्हणाली, “मला वाटते की माझी प्रेमळ आई जे करते आहे ते खूप महत्वाचे आणि आश्चर्यकारक आहे. खरं तर हे खूप समृद्ध आणि समाधान देणारं आहे. ती जगाला मदत करत आहे. आम्हा सर्वांना मदत करत आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आई तू जे करत आहेस ते खरोखरच अविश्वसनीय आहे.”

मुलीने केलेलं कौतुक ऐकून ऐश्वर्या आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आराध्याचं बोलणं संपल्यावर तिथे उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. भारावलेल्या ऐश्वर्याने आराध्याला मिठी मारली. आराध्या आईबद्दल जे बोलली, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेक जण आराध्याच्या समजदारीचं कौतुक करत आहेत.

दरम्यान, ऐश्वर्याने वाढदिवसाच्या दिवशी आई व लेक आराध्याबरोबर सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले व या इव्हेंटला हजेरी लावली. आपल्या अप्रतिम सौंदर्यासह अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ऐश्वर्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला.