अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या हे तिघेही दोन दिवसांपूर्वी एअरपोर्टवर दिसले होते. त्यांचा फॅमिली व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आराध्या पापाराझींना नमस्कार करताना दिसली होती, त्यानंतर तिचं खूप कौतुक केलं जात आहे. अशातच या एअरपोर्ट लूकमध्ये आराध्याने कॅरी केलेल्या बॅगने लक्ष वेधून घेतलं आहे.
आराध्याने एअरपोर्टवर कॅरी केलेल्या बॅगच्या किंमतीत तुमची एखादी परदेश ट्रिप होऊ शकते, इतकी ती महाग आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की आराध्याने लाइट ब्लू रंगाची स्ट्रेट कट जीन्स घातली होती. तिने त्यावर टी-शर्ट आणि गॅप ब्रँडचे जॅकेट घातले होते. मल्टीकलर्स स्नीकर्सने तिने तिचा लूक पूर्ण केला होता.
“डॉक्युमेंट्सवर कोणतंही नाव असलं तरी मनात…”, गश्मीर महाजनीची जुनी पोस्ट व्हायरल; म्हणालेला…
आई-बाबांबरोबर प्रवास करून परतलेल्या आराध्याच्या खांद्यावर एक बॅकपॅक होती, त्या बॅगने चाहत्यांचं लक्ष वेधलंय. ती बॅग जगातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी ब्रँडपैकी एक गुच्ची ब्रँडची होती. त्यावर लोगो आणि पिवळ्या स्टार्सची प्रिंट होती. बॅगवरील स्ट्रॅप्स, झिप आणि साइड पोर्शन देखील पिवळ्या रंगाचे होते.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, आराध्या बच्चनच्या खांद्यावरील या क्यूट बॅगची किंमत थोडीथोडकी नाही तर १६५२ डॉलर्स आहे. भारतीय चलनात ती १ लाख ३५ हजार ४४८ रुपयांची आहे. आराध्याच्या बॅगची जेवढी किंमत आहे, तेवढ्या पैशात एक छोटीशी परदेश ट्रिप सहज होऊ शकते.