ऐश्वर्या राय बच्चन ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली. तिने गुरुवारी या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर वॉक केला. तिचा कानमधील ग्लॅमरस लूक समोर आला आहे. चाहते ऐश्वर्याच्या लूकचं, तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत. ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर होतं, पण तरीही अभिनेत्रीने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने उपस्थितांना भुरळ पाडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तिच्या मुलीबरोबर गेली आहे. तिची १२ वर्षांची लेक आराध्या या सोहळ्यात चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. याचं कारण म्हणजे तिने आईची घेतलेली काळजी. रेड कार्पेटवरील वॉकनंतर हॉटेलमधून बाहेर पडताना आराध्या बच्चन हिने आईचा हात धरला आणि तिचा ड्रेस सांभाळण्यात तिला मदत केली. ती तिच्या आईचा हात पकडून चालत होती. इतकंच नाही तर आराध्याने तिचा हात धरून तिला पायऱ्या उतरण्यास मदत केली. आराध्या व ऐश्वर्याचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दुखापतग्रस्त हाताला प्लास्टर, सुंदर ड्रेस अन्…; Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली ऐश्वर्या राय बच्चन, ग्लॅमरस अंदाज चर्चेत

एका व्हिडीओमध्ये, आराध्या आणि ऐश्वर्या हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरताना दिसत आहेत. यावेळी आराध्या तिच्या आईला आधार देताना दिसते.

ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ‘मेगालोपोलिस’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी गोल्डन टच असलेल्या ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. फाल्गुनी शेन पीकॉकने हा ड्रेस डिझाइन केला होता.

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

२००२ पासून ऐश्वर्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नियमित हजेरी लावत आहे. ती पहिल्यांदा शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या लोरिअल या ब्रँडची अम्बॅसिडर म्हणून ‘कान’मध्ये रेड कार्पेटवर वॉक करत असते. ऐश्वर्याची लाडकी लेकं आराध्याही काही वर्षांपासून तिच्या आईसोबत ‘कान’ला जात आहे.

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

बुधवारी संध्याकाळी ऐश्वर्या मुंबई विमानतळावर तिची मुलगी आराध्या बच्चनसह फ्रेंच रिव्हिएराला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी ऐश्वर्याच्या हाताला असलेलं प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. हाताला प्लास्टर असलं तरी ऐश्वर्याने ज्या अदाकारीने व ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर वॉक केला, ते पाहून आता चाहते तिचं कौतुक करत आहेत. या वर्षी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याबरोबरच भारतीय अभिनेत्री कियारा अडवाणी, सोभिता धुलिपाला, अदिती राव हैदरी देखील सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaradhya bachchan was taking care of mother aishwarya rai at cannes 2024 video viral hrc