‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनु अग्रवाल ही ९० च्या दशकातील ‘नॅशनल क्रश’ होती. या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘आशिकी’ हा चित्रपट आजही प्रचंड गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानंतर काही वर्षांनी अनु अग्रवालचा मोठा अपघात झाला होता. या अपघातानंतर तिची स्मृती गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’मध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटानंतर राहुल व अनु यांना खूप लोकप्रियता मिळाली. पण इतक्या मोठ्या यशानंतर पाच वर्षांनी अनु अभिनयापासून दूर गेली. १९९९ मध्ये तिचा अपघात झाला, या अपघाताने तिचं आयुष्य बदललं. या अपघातानंतर अनु २९ दिवस कोमात होती आणि अपघातात डोक्याला मार लागून तिची स्मृती गेली होती.

जात सर्वेक्षणाबद्दल शरद पोंक्षेंचे विधान; म्हणाले, “मी ब्राह्मण आहे, मला…”

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तिने स्मृतीभ्रंश झाला, तेव्हाचे दिवस आठवले. “अपघातानंतर माझी स्मृती गेली तेव्हा मी हा चित्रपट पाहिला होता. माझ्या आईने माझ्यासाठी तो चित्रपट लावला होता, परंतु मी त्या पडद्यावरील मुलीशी रिलेट करू शकले नाही! माझी आई म्हणत राहिली, ‘ही तूच आहेस!’ मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या मुलीला पाहत राहिले, पण मला आठवतच नव्हतं. आईने माझ्यासाठी हे सगळं केलं होतं, पण मला त्या चित्रपटाचा काहीच अर्थ लागत नव्हता,” असं अनु म्हणाली.

हेही वाचा- “पुष्कर जोगकडे संस्कार नाहीत”, जात सर्वेक्षणाच्या पोस्टवरून मनोज जरांगे पाटलांची टीका; म्हणाले, “मागास सिद्ध…”

“ती मला म्हणाली, ‘हे बघ तुझा आशिकी चित्रपट होता आणि आता त्यांनी आशिकी २ बनवला आहे.’ मी तिला विचारले, ‘२ म्हणजे काय?’ कारण मला संख्या माहित नव्हती, एक, दोन, तीन म्हणजे काय. अशी माझी अवस्था होती,” असं अनुने सांगितलं. “पडद्यावरील मुलगी मी आहे असं मला वाटलं नाही, परंतु मला भावना जाणवल्या. चित्रपटात अशा भावना होत्या म्हणूनच लोक अजूनही या चित्रपटाबद्दलही बोलतात. त्यामुळे जे प्रेक्षक हा सिनेमा पाहतात ते त्याबद्दल बोलतात. चित्रपटादरम्यान लोक पडद्यावर पैसे फेकत होते, हसत होते आणि रडत होते. हे सगळं घडलं कारण या चित्रपटात सर्वच भावना होत्या,” असं अनु म्हणाली.

“तुम्ही त्याला इतकं ट्रोल केलं की तो आता…”, पती नुपूरचा फोटो पोस्ट करत आयरा खानचं विधान

चित्रपटसृष्टीतून स्वेच्छेने दूर झाल्यानंतर आता जवळपास तीन दशकांनंतर अभिनयाकडे परत येण्यासाठी अनु चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. “माझे पहिले प्रेम मॉडेलिंग, मनोरंजन क्षेत्र आहे. मी अभिनेत्री आहे. मी खूप दिवसांपासून या क्षेत्रापासून दूर आहे, पण मी इथे अभिनय करण्यासाठी परत आले आहे. मी चित्रपट निर्मात्यांना भेटायला सुरुवात केली आहे, मी पुनरागमनासाठी तयार आहे आणि स्क्रिप्ट ऐकत आहे. मला कथा आवडल्यास मी चित्रपट साइन करेन,” असं अनु अग्रवाल म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aashiqui fame anu aggarwal recalls accident and memory loss hrc