प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरिजमधून अभिनेत्री त्रिधा चौधरी प्रकाश झोतात आली. त्रिधा चौधरी हा बंगाली, तेलगु सिनेसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा आहे. बंगाली, तेलगु चित्रपटांच्या बरोबरीने त्रिधाने मालिका तसेच ‘स्पॉटलाइट’, ‘बंदिश बँडिट्स’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ‘आश्रम’ वेबसीरिजमधील ही बबीता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लवकरच बबिता म्हणजेच त्रिधा चौधरी ही लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द त्रिधानेच या गोष्टीची पुष्टी केली आहे. आपल्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असणाऱ्या त्रिधाने लवकरच लग्न करणार असल्याचं स्पष्ट केल्याने तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्रिधाने याबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘डॉन ३’मध्ये ‘जंगली बिल्ली’ म्हणून पुन्हा झळकणार प्रियांका चोप्रा; लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

कलकत्ता टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याबद्दल खुलासा केला आहे. त्रिधा पुढील वर्षी लग्न करणार असून तिचा होणारा नवरा, तिचा जोडीदारदेखील याच क्षेत्रातील असल्याचेही संकेत तिने दिले आहेत. आता त्रिधाच्या चाहत्यांना तिचा नेमका जोडीदार आहे तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. यामुळे बरेच चाहते सोशल मीडियावर त्रिधाकडे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जाहीर करण्याची विनंती करतानाही दिसत आहेत.

याबद्दल बोलताना त्रिधा म्हणाली, “भलेही मी याच मनोरंजन विश्वातील व्यक्तीला डेट केलं असलं तरी आम्ही त्याचा कुठेही गाजावाजा केलेला नाही, आम्ही आमची प्रायव्हसी जपलेली आहे. आमच्या नात्यामुळे आमच्या कामावर परिणाम होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे.” पुढील वर्षी लग्न करायचा विचार असल्याचं त्रिधाने या मुलाखतीमध्ये सांगितलं ज्यामुळे ती जास्त चर्चेत आली आहे. त्रिधाने २०१३ मध्ये श्रीजित मुखर्जी यांच्या ‘मिशावर रोहस्यो’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. आता ती चित्रपटांसह ओटीटी मालिकांमध्येही झळकते आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aashram fame actress tridha choudhary confirms her news of getting married avn