अभिनेता आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आतापर्यंत अनेक वेगळ्या विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून तो काही ना काही महत्वपूर्ण संदेश प्रेक्षकांना देत असतो. असाच त्याचा अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘विकी डोनर.’ या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल त्याने मोठा खुलासा केला आहे.

‘विकी डोनर’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आयुष्मानने एका स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा दूसरा भाग प्रदर्शित व्हावा अशी त्याच्या चाहत्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आता त्याने त्याबद्दल भाष्य केलं आहे. नुकतीच त्याने दिल्ली येथे झालेल्या ‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘विकी डोनर २’ बनवण्यासाठी तो इच्छुक असल्याचं सांगत एक पण ठेवला आहे.

आणखी वाचा : सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

हेही वाचा : “माझा प्रेमभंग झाला तेव्हा…”; अपारशक्ती खुरानाने शेअर केला होता त्याचा अनुभव

‘अजेंडा आज तक’ दरम्यान घेतलेल्या मुलाखतीत त्याला “‘विकी डोनर २’ प्रेक्षकांना पहायला मिळणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आयुष्मान म्हणाला, “मला नक्कीच विकी डोनर २’ बनवायचा आहे, पण आत्ता नाही. मी हा चित्रपट आणखी १० वर्षांनी बनवेन. म्हणजे तोपर्यंत विकीची सगळी मुलं मोठी झाली असतील आणि तो त्या मुलांकडे नीट लक्ष देऊ शकेल.” त्याच्या या उत्तराने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं. आता त्याचे चाहते आता या चित्रपटाची आतापासूनच वाट बघत आहेत.

Story img Loader