बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आत्तापर्यंत जगभरात या चित्रपटाने ९०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखच्या चाहत्यांनी तसेच कित्येक सेलिब्रिटीजनीसुद्धा हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. बिग बॉसच्या १६ व्या पर्वात सहभाग घेत कित्येकांची मनं जिंकणारा ताजिकिस्तानचा छोटा गायक अब्दू रोजिक हादेखील शाहरुखच्या आकंठ प्रेमात बुडाला आहे. मीडिया रीपोर्टनुसार शाहरुखचा ‘पठाण’ पाहण्यासाठी अब्दू रोजिकने मुंबईत संपूर्ण चित्रपटगृह बूक केलं होतं.

आणखी वाचा : “ट्रोलिंग सेना…” सोशल मीडियावरील ‘बॉयकॉट’ ट्रेंडबद्दल ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं वक्तव्य

चित्रपट सुरू होण्याआधी अब्दू रोजिकने शाहरुखला भेटायची इच्छा व्यक्त केली. अब्दू रोजिक म्हणाला, “शाहरुख सर मला तुम्हाला भेटायचं आहे. केवळ तुमच्यावरील प्रेमाखातर आम्ही संपूर्ण थिएटर बूक केलं आहे पठाण बघण्यासाठी आणि धमाल मस्ती करण्यासाठी.” अब्दू रोजिकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याबरोबरच अब्दूने थिएटरमध्येच ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर ठेका धरत शाहरुखच्या स्टाइलमध्ये डान्स केला आहे. अब्दूचा हा डान्स पाहून त्याच्या निरागसतेचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. अब्दू हा अगदी एका लहान मुलाप्रमाणे निर्मळ मनाचा आहे असंही काही नेटकऱ्यांनी कमेंट करत सांगितलं.

‘बिग बॉस’मुळे अब्दूला चांगलीच लोकप्रियता मिळाली. भारतातही त्याचे प्रचंड फॅन्स आहेत. तो मुळचा ताजिकिस्तान आहे. अठरा वर्षांचा अब्दू गायक आहे. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. तो सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdu rozik bigg boss 16 fame books entire theatre to watch shahrukh khans pathaan avn