गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांच्याबरोबर काम करताना त्यांना आलेल्या अनुभवावर भाष्य केले आहे. अभिजीत यांनी रेहमान यांच्याबरोबर फक्त एकाच गाण्यावर काम केले आहे. ‘ऐ नाजनीन सुनो ना’ या गाण्यासाठी त्यांनी एकत्र काम केले आहे. अभिजीत यांनी ए आर रेहमान यांच्या रात्री काम करण्याच्या सवयीवरही भाष्य केले आहे.

‘बॉलीवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत, अभिजीत यांना त्यांनी ए आर रेहमान यांच्याबरोबर फक्त एकदाच का काम केले याबद्दल विचारले . त्यावर ते म्हणाले, “त्या काळात मला सर्व मोठ्या संगीतकारांकडून फोन येत होते. अनु मलिक, आनंद-मिलिंद, जतिन-ललित सर्वजण फोन करत होते. मी सतत डबिंगमध्ये व्यस्त होतो. मी रेहमान यांना भेटण्यासाठी गेलो आणि मला हॉटेलमध्ये थांबून ठेवण्यात आले.”

aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Amitabh bachchan post about ratan tata death
एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Govinda and wife Sunita Ahuja live separately
गोविंदा व त्याची पत्नी राहतात वेगळे, सुनीता आहुजा पतीबद्दल म्हणाली, “त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ…”
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

हेही वाचा…एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन…; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स

ते पुढे म्हणाले, “मी ठरवले की मी थांबणार नाही आणि मी सकाळी रेकॉर्डिंग करेन. मी घरी गेल्यानंतर मला रात्री २ वाजता स्टुडिओतून फोन आला आणि त्यांनी मला गायनासाठी बोलावले. मी त्यांना सांगितले की, मी झोपलो आहे. मी सकाळी गेलो, पण तिथे ते नव्हते. त्यांना नियमित वेळेत काम करण्याची सवय नाही. मला व्यवस्थित पद्धतीने काम करायला आवडते. आता क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही म्हणाल की रात्री ३:३३ वाजता रेकॉर्डिंग होईल, तर मला हे पटत नाही.”

अभिजीत यांनी सांगितले की, “त्या दिवशी स्टुडिओत रेहमान यांचे सहाय्यक होते आणि तेच सगळं काम बघत होते. माझ्या रूममधील एअर-कंडिशनिंगमुळे मला सर्दी झाली होती. पण त्यांनी आग्रह केला की मी गाऊन दाखवावे. मी अनेक सुपरफ्लॉप चित्रपटांसाठी हिट गाणी गायली आहेत आणि हे त्यापैकी एक होतं. कोणीही तो चित्रपट पाहिला नाही. गाणं रेहमानचं आहे असं सांगून त्यांनी रेहमान यांना श्रेय दिले.” अभिजीत पुढे म्हणाले, “मी रेहमान यांना विचारत राहिलो, पण मला ठाम उत्तर मिळालं नाही. एखादा कलाकार अशा गोष्टींमुळे मोठा किंवा लहान होत नाही… मला सांगण्यात आलं की, मी त्यांची वाट बघून त्यांना भेटून नंतर जावे . पण मी त्यांना सांगितले की, माझी आधीची काही कामे आहेत.”

हेही वाचा…सलमान खानने सोनू सूदला दिली होती ‘दबंग २’ची ऑफर, अभिनेत्याने ‘या’ कारणामुळे नाकारला होता चित्रपट; म्हणाला…

अभिजीत यांनी ‘रंगीला’ चित्रपटासाठी प्लेबॅक करण्याची संधी मिळणार होती पण ते या सिनेमात का गायन करू शकले नाही यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “मला सांगण्यात आले की गाणे बदललं गेलं आहे आणि उदितने (उदित नारायण यांनी) आधीच पात्रासाठी गायलं आहे, त्यामुळे तुमचे व्होकल्स वेगळ्या पद्धतीने वापरले जातील. तेव्हा मला कळलं की हे संगीतासाठी योग्य ठिकाण नाही. ”

Story img Loader