Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय-बच्चन हे सध्या बॉलीवूडमधलं बहुचर्चित कपल आहे. सातत्याने दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होतं आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या एकत्र दिसले नाही. तेव्हापासून अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आलं. काही दिवसांपूर्वी यासंबंधित अभिषेकचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिषेक व ऐश्वर्या आपल्या लेकीबरोबर एकत्र पाहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या राय-बच्चनच्या ( Aishwarya Rai Bachchan ) फॅन पेजवर व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अभिषेक बच्चन व ऐश्वर्याचा हा व्हिडीओ दुबई विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक ऐश्वर्या व आराधाच्या पुढे चालताना दिसत आहे. तर दोघी मायलेकी हातात हात घालून चालताना पाहायला मिळत आहे. यावेळी अभिषेक लाल हुडीमध्ये दिसत असून ऐश्वर्याने पूर्ण काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. अभिषेक, ऐश्वर्या व आराध्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पण अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, हा जुना व्हिडीओ आहे.

हेही वाचा – Video: “नाच्या, बायल्या, छक्का म्हणायचे”, अभिनेत्याने सांगितला कथ्थक शिकतानाचा अनुभव, म्हणाला, “२० वर्षापूर्वी…”

अभिषेक व ऐश्वर्याच्या ( Aishwarya Rai Bachchan ) व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्यानेही लिहिलं आहे, “हा गेल्या वर्षीचा व्हिडीओ आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, आराध्याच्या लूककडे पाहा. आता तिचा लूक बदलला आहे. त्यामुळे हा जुना व्हिडीओ आहे.

हेही वाचा – निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”

ऐश्वर्या बच्चन कुटुंबातील ‘याच’ सदस्याला इन्स्टाग्रामवर करते फॉलो

दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या ( Aishwarya Rai Bachchan ) फक्त अभिषेकलाच फॉलो करते. बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याला फॉलो करत नाही. सासरे अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या फॉलो करत नाही आणि त्यांच्याबरोबर ती जास्त दिसतही नाही. कोणताही कार्यक्रम असो ऐश्वर्या सासरच्यांपासून दूर-दूर असते. त्यामुळेच ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना नेहमी उधाण येत असतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan aishwarya rai bachchan together with aaradhya bachchan at dubai airport goes viral amid divorce rumours netizens says old video pps