Aaradhya Bachchan Birthday : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची लाडकी नात, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांची एकुलती एक लेक आराध्या बच्चनचा आज वाढदिवस आहे. आराध्या आज तिचा १२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने खास पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याने आराध्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“डार्लिंग आराध्या मी तुझ्यावर अमर्याद व बिनशर्त प्रेम करते. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस… मी तुझ्यासाठी श्वास घेते… तुला १२ व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते, तू सर्वोत्तम आहेस,” भरपूर इमोजींसह असं कॅप्शन देत ऐश्वर्याने आराध्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.
आराध्याचा बाबा अभिषेक बच्चननेही लेकीबरोबरचा एक गोंडस फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “माझ्या राजकुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो,” असं कॅप्शन अभिषेकने पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, ऐश्वर्या व अभिषेकने लाडक्या लेकीसाठी केलेल्या पोस्टवर चाहते आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. प्रिती झिंटा, अथिया शेट्टी, श्वेता बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर आराध्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी दोन्ही पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.