गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा थांबायचं काही नावचं घेत नाहीये. शिवाय यावर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी देखील मौन धारण केलं आहे. पण, आता दोघांचा घटस्फोटाच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं जात आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं जात आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची लेक आराध्याचा १६ नोव्हेंबरला वाढदिवस होता. या वाढदिवसाचे आणि पार्टीचे फोटो ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोमध्ये अभिषेक बच्चन नव्हता. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच उधाण आलं. पण असं नाहीये. अभिषेक आणि ऐश्वर्याने लेकीचा १३वा वाढदिवस आणि पार्टी एकत्र केली होती. याचेच व्हिडीओ समोर आले आहेत.
आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करणाऱ्यांनी दोन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या लेकीच्या वाढदिवसाची पार्टी सुंदर आयोजित केल्यामुळे त्यांचे आभार मानताना दिसत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याचा वेगवेगळा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या १३ वर्षांपासून आराध्याच्या वाढदिवसाची पार्टीचं आयोजन जतीन भिमानी करत आहेत.
दरम्यान, गेल्या कित्येक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात ऐश्वर्या व बच्चन कुटुंब एकत्र दिसलं नाही. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक वाव मिळाला. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त अभिषेकलाच फॉलो करते. बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याला फॉलो करत नाही. सासरे अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या फॉलो करत नाही आणि त्यांच्याबरोबर ती जास्त दिसतही नाही. कोणताही कार्यक्रम असो ऐश्वर्या सासरच्यांपासून दूर-दूर असते.
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी मधुराणी प्रभुलकरचं भाष्य, म्हणाली…
ऐश्वर्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘पोन्नियिन सेलवन: २’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारली आहे. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दोन भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. एका तामिळ कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या व्यतिरिक्त कार्ती, जयम रवी, त्रिशा, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रका राज, रहमान आणि आर पार्थिवन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा नुकताच ‘आय वॉन्ट टू टॉक’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक इतर बॉलीवूड कलाकार मंडळींसह चाहते करत आहेत. तसंच लवकरच तो ‘हाउसफुल्ल ५’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.