बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करीत आहे. ५ फेब्रुवारी १९७६ रोजी अभिषेकचा जन्म मुंबईत झाला होता. बिग बींच्या मुलाने बॉलीवूडमध्ये आपल्या हिमतीवर वेगळे स्थान निर्माण केले. हिट चित्रपटांसह अनेक फ्लॉप चित्रपटांचाही त्याला सामना करावा लागला. अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्रित काम केलेल्या एका फ्लॉप चित्रपटानंतर बिग बींना खूप राग आला होता. या रागामागचे कारणही तेवढेच विशेष होते. अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त हा किस्सा जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१० मध्ये अभिषेकने ऐश्वर्या रायसह एक चित्रपट केला होता आणि त्याचे नाव होते ‘रावण’. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. या चित्रपटात अभिषेकने बिरा मुंडाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नायक नाही तर खलनायक म्हणून अभिषेकने काम केले होते. त्यात ऐश्वर्या राय रागिनी शर्माच्या भूमिकेत दिसली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांना हा चित्रपट बिलकूल आवडला नव्हता. अशा परिस्थितीत चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एडिटिंग टीमवर राग काढला. त्यांनी चित्रपटाच्या एडिटिंगला दोष दिला. अभिषेकची भूमिका एडिटिंगमुळे बिघडली असल्याचेही ते म्हणाले होते.

हेही वाचा… ‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने का सोडले मालिकाविश्व? म्हणाला, “स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या…”

ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा काही पहिलाच चित्रपट नव्हता. या जोडप्याने याआधीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले होते. काही चित्रपट सोडल्यास त्यांचे बरेच चित्रपट फ्लॉप झाले होते; परंतु दुसऱ्या कलाकारांसह ऐश्वर्याचे चित्रपट सुपरहिट ठरले होते आणि तिला प्रसिद्धीही मिळाली होती.

ज्युनियर बच्चनने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातले काही हिट; तर काही फ्लॉप झाले. मागील काही काळात अभिषेकचे १७ चित्रपट फ्लॉप झाले. परंतु, ओटीटीवर आल्यानंतर अभिषेकला मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. अभिषेकचे ‘दसवी’, ‘बिग बुल’, ‘घूमर’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आर. बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ चित्रपटाने ओटीटीवर चांगली कामगिरी केली होती. हा चित्रपट एका दिव्यांग महिला खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित होता.

हेही वाचा… रितेश – जिनिलीया कुटुंबासह फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचले सौदी अरेबियात; मेस्सीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

दरम्यान, अभिषेक अनेक आगामी चित्रपटांसाठी सध्या काम करीत आहे आणि लवकरच त्याचा ‘गुलाब जामुन’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.