Abhishek Bachchan buys a luxury apartment : अभिषेक बच्चन सध्या एका कारणामुळे खूप चर्चेत असतो, ते म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर घटस्फोट. गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण या चर्चांवर दोघांनी मौन पाळलं आहे. अनेक कार्यक्रमात ऐश्वर्या फक्त आराध्याबरोबर दिसते. त्यामुळे अजूनच घटस्फोटाच्या चर्चांना वाव येत असतो. अशातच अभिषेकने नवीन मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉम्बे टाइम्स’च्या वृत्तानुसार अभिषेक बच्चनने वडील अमिताभ बच्चन ( Abhishek Bachchan ) यांच्या ‘जलसा’ बंगल्या शेजारीचं मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे आता अभिषेक अमिताभ यांचा शेजारी झाला आहे. अभिनेत्याने खरेदी केलेल्या आलिशान अपार्टमेंटमधून जुहूचा समुद्र किनारा दिसतो.

हेही वाचा – “वाइल्ड कार्ड एन्ट्री…”, संग्राम चौगुलेवर टीका करत मराठी अभिनेत्याने अरबाजचं केलं कौतुक, म्हणाला…

माहितीनुसार, बच्चन कुटुंबाकडे एकाच ठिकाणी बरीच संपत्ती आहे आणि आता यामध्ये अभिषेकने खरेदी केलेला अपार्टमेंट सामील झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारने देखील याच ठिकाणी गुंतवणूक केली आहे. अभिषेकने ( Abhishek Bachchan ) खरेदी केलेल्या आलिशान अपार्टमेंटची किंमत अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चनने बोरिवलीत एकूण सहा नवे फ्लॅट्स खरेदी केले होते. माहितानुसार, ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये अभिनेत्याने सहा फ्लॅट्स खरेदी केले होते. यासाठी अभिषेकने ( Abhishek Bachchan ) कोट्यावधी रुपये मोजले आहेत. बोरिवलीतील या फ्लॅटची किंमत १५.४१ कोटी आहे.

हेही वाचा – Video: अभिजीत सावंतला साडी नेसवून केला भन्नाट मेकअप, अरबाज म्हणाला, “छम्मक छल्लो”

दरम्यान, अभिषेक बच्चनच्या ( Abhishek Bachchan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं २००० साली अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘रिफ्यूज’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्यानंतर अभिषेकनं बऱ्याच चित्रपटात काम केलं. दिलीप कुमार यांच्यानंतर अभिषेक हा दुसरा अभिनेता आहे, ज्याला अभिनयासाठी सलग तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. असा हा हरहुन्नरी अभिनेता शेवटचा ‘घूमर’ चित्रपटात झळकला होता. लवकरच त्याचा ‘हाउसफुल्ल ५’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमार, फर्दीन खान, पूजा हेगडे, चित्रांगणा सिंग या कलाकारांबरोबर पाहायला मिळणार आहे. तसेच अभिषेकचे अजून काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan bought a luxury apartment in mumbai two months after buying 6 flats pps