अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट शुक्रवारी (२२ नोव्हेंबरला) प्रदर्शित झाला. शूजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहता या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आय वॉन्ट टू टॉक’ला या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्यांनी हा सिनेमा पाहिला, तेही याचं कौतुक करत आहेत. लोकांनी याला अभिषेकच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटही म्हटलं आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी ‘आय वॉन्ट टू टॉक’ने किती कलेक्शन केले ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – ३५० कोटींचे बजेट, १० दिवसांत कमावले फक्त ६५ कोटी; ‘कंगुवा’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? वाचा

‘आय वॉन्ट टू टॉक’चे तीन दिवसांचे कलेक्शन

‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाचे फार प्रमोशन करण्यात आले नव्हते. तसेच याची फार चर्चाही झाली नाही, कारण हा चित्रपट खास प्रेक्षकवर्गासाठी आहे. यातील बरेचसे संवाद इंग्रजीत आहे. हा कमर्शिअल सिनेमा नाही. हा सिनेमा कमी स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘आय वॉन्ट टू टॉक’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २५ लाखांची कमाई केली आणि शनिवार आणि रविवारी त्यात थोडीशी वाढ झाली. शनिवारी या चित्रपटाने ५५ लाखांची कमाई केली होती. आता रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

सुपरहिट चित्रपट दिले अन् मुंबई सोडून ‘इथे’ निघून गेला आमिर खानचा भाऊ; आता करतोय ‘हे’ काम, म्हणाला…

‘आय वॉन्ट टू टॉक’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ५० लाखांची कमाई केली. चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन १.३० कोटी रुपये झाले आहे.

‘आय वॉन्ट टू टॉक’ला बॉक्स ऑफिसवर विक्रांत मॅसीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ तसेच ‘भूल भुलैया 3’ कडून टक्कर मिळतेय. दोन्ही चित्रपट चांगली कमाई करत आहेत. ‘आय वॉन्ट टू टॉक’ ओपनिंग वीकेंडला फारशी कमाई करू शकला नाही, पण रिव्ह्यू व प्रेक्षकांच्या कौतुकामुळे या चित्रपटाची कमाई वाढेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

Pushpa 2 : यंदा समांथा नव्हे तर श्रीलीलाने गाजवलं ‘पुष्पा २’चं आयटम साँग! ‘Kissik’ गाण्याची पहिली झलक आली समोर

‘आय वॉन्ट टू टॉक’मधील कलाकार

‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामध्ये अहिल्या बामरू, जॉनी लीव्हर, जयंत कृपलानी, पर्ल डे आणि क्रिस्टिन गोडार्ड यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan film i want to talk box office collection hrc