KBC : अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपती’ घराघरांत पाहिला जातो. या शोमध्ये आता त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन पाहुणा म्हणून येणार आहे. लवकरच अभिषेकचा ‘आय वाँट टू टॉक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये येणार आहे. नुकताच ‘KBC 16’ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मजेशीर संवाद ऐकायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेकची शोमध्ये मस्ती

प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेकने अमिताभ यांची नक्कल केली आहे. त्याने सर्वांना सिंगतले, “आमच्या घरी संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण करतं. यात कोणीही काही प्रश्न विचारला की, सर्व मुलं एकत्र ओरडून बोलतात ७ करोड.” ७ करोड बोलताना अभिषेकने अगदी हुबेहुब अमिताभ बच्चन यांची नक्कल केली आहे. हे पाहून शोमध्ये सर्व जण हसू लागतात.

हेही वाचा : मृणाल दुसानिसची ४ वर्षांपूर्वीची सुपरहिट मालिका पुन्हा सुरू होणार! ‘कलर्स मराठी’ने शेअर केली मोठी अपडेट

अभिषेकने ठेवली अट

अभिषेक बच्चन या आधीदेखील ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये आला आहे. तो जेव्हाही येथे येतो तेव्हा फार मजामस्ती करतो आणि सर्वांना हसवतो. आतादेखील त्याने असेच काही केल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. त्याने मस्तीमध्ये अमिताभ बच्चन यांना अट घातली. अभिषेक म्हणाला, “माझ्यासाठी येथे वाजत असलेला भोंगा बंद करा. म्हणजे मी शांतपणे प्रत्येक प्रश्नाचा विचार करेल आणि योग्य उत्तरे देईल.” तसेच प्रोमोमध्ये अभिषेक पुढे म्हणतो की, “मी सात करोड रुपये जिंकल्याशिवाय येथून जाणारच नाही.” त्याचं हे वक्तव्य ऐकून अमिताभ बच्चन हसू लागले. तसेत ते म्हणाले की, “याला शोमध्ये बोलवून मी मोठी चूक केली.”

सुजित सरकार दिग्दर्शित ‘आय वाँट टू टॉक’ चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये अभिषेकबरोबर सुजित सरकारदेखील शोमध्ये आला आहे. अभिषेकची मस्ती पाहून सुजित हसत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. सुजित सरकारने या आधी देखील अभिषेकबरोबर काम केलं आहे. ‘शूबाईट’, ‘पीकू’, ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र कामे केली आहेत.

हेही वाचा : “या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”

u

काही दिवसांपूर्वी अभिषेकच्या ‘आय वाँट टू टॉक’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. चाहते आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आणि चित्रपटगृहात पाहण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan i dont go unless i win rs 7 crore amitabh bacchan show kon banega crorepati rsj