Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन हे एकमेकांपासून वेगळे होणार असून घटस्फोट घेणार असलेच्या चर्चांना उधाण आले होते. आता अभिषेक बच्चनने सोशल मीडियावरील घटस्फोटासंबंधी एका पोस्टला लाइक केल्याने या चर्चांमध्ये भर पडली आहे.

Abhishek Bachchan ने लाइक केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

हीना खंडेलवाल यांनी सोशल मीडियावर, घटस्फोटासंबंधी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जेव्हा प्रेम करणं सोपं राहत नाही, तेव्हा लग्न केलेली जोडपी विभक्त होतात. त्यांच्या घटस्फोटाला कोणते घटक कारणीभूत ठरतात आणि वयाच्या ५० वर्षानंतर घटस्फोट होण्याचे प्रमाण का वाढत आहे? असा आशय असलेली ही पोस्ट होती.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

हेही वाचा: अथिया शेट्टी-केएल राहुलने मुंबईत घेतलं आलिशान घर, स्टॅम्प ड्युटी १.२० कोटी, तर अपार्टमेंटची किंमत तब्बल…

याबरोबरच त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होते की, घटस्फोट घेणे कुठल्याही व्यक्तीसाठी सोपे नसते. म्हातारपणी जोडीदाराचा हात हातात घेऊन रस्ता पार करण्याचे कोणती व्यक्ती स्वप्न पाहत नाही? पण आयुष्य आपण जसा विचार करतो तसे असत नाही. अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर लोक कसे काय वेगळे राहण्याचा विचार करतात? आयुष्यातली अनेक महत्वाची वर्षे एकमेकांसोबत घालवल्यानंतर, अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहिल्यानंतर ते एकमेकांपासून कसे वेगळे होतात? कोणत्या गोष्टींमुळे ते एकत्र राहतात आणि कोणत्या समस्यांचा सामना करतात? अशा आशयाचे त्यांनी कॅप्शन दिले होते. या घटस्फोटासंबंधित पोस्टला अभिषेक बच्चनने लाइक केल्याने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

इन्स्टाग्राम

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यातदेखील अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासोबत तर ऐश्वर्या राय आपल्या मुलीसह हजर राहिली होती. बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या एकत्र न आल्याने या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचे म्हटले जात होते. याआधी देखील ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांंना उधाण आले होते. मात्र अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्या यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. आता ते याबद्दल काय सांगणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, अभिषेक बच्चन लवकरच किंग खान बरोबर अभिनय करताना दिसणार असणार आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर ज्युनिअर बच्चनला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader